एक्स्प्लोर
मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान, राज्यभरात पारा घसरला
मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे. मुंबईत आज निचांकी म्हणजे 13.6 इतकं तापमान आहे.
मुंबई : मुंबई, पुणे, नाशिकसह सध्या राज्यात थंडीचा कडाका बराच वाढला आहे. मुंबईत आज निचांकी म्हणजे 13.6 इतकं तापमान आहे. काल 13.8 तापमान होतं तर तिकडे निफाडचं आजचं तापमान तर 7.4 अंशावर आलं आहे. तर इकडे पुण्याचा पाराही 9 अंशावर पोहोचला आहे.
खरं तर जानेवारी महिना सुरु होताच थंडीचा जोर कमी होण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा याऊलट चित्र बघायला मिळतं आहे. निफाड परिसरात सर्वाधिक द्राक्षाचं पिक घेतलं जातं. मात्र, थंडीमुळे द्राक्षमण्यांची फुगवणी थांबली. त्यांना तडे गेले आहेत, यामुळे द्राक्ष निर्यात होतील की नाही याची भीती बागायतदरांमध्ये आहे.
सध्या शेतकऱ्यांची संपूर्ण रात्र शेतातच जात आहे. अगदी पहाटे पासूनच शेकोटी करून द्राक्षाला ऊब देत द्राक्षाचं फळ वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement