एक्स्प्लोर
Advertisement
बीडच्या दाम्पत्याची स्वच्छतेची दिवाळी, खर्च टाळून शौचालय बांधले
बीड: दिवाळी संपून आता दोन आठवडे होत आहेत. पण या आनंददायी क्षणी बीडच्या साळेगावमधील एका दाम्पत्याने यंदाची दिवाळी साजरी न करता, त्याच पैशातून शौचालय बांधून घरात स्वछतेची एक पणती लावली आहे.
बीड जिल्ह्यातील केजपासून सहा किलोमीटर साळेगाव या छोट्यासे गाव आहे. या गावातील गौतम बचुटे आणि संगीता बचुटे या दाम्पत्याने यावर्षीची दिवाळी साजरी न करता त्यावर होणारा व्यर्थ खर्च टाळून शौचलय बांधलं.
दिवाळी येताच मुलांनीदेखील नव्या कपड्यांचा हट्ट त्यांच्याकडे केला. मात्र, मुलांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देऊन ही दिवाळी शौचालय बांधून साजरी केली. विशेष म्हणजे, शौचालय बांधत असताना त्यांच्या जवळील पैसे संपले तरी त्यांनी मित्रांकडून उसनवारी करुन या शौचालयाचे बांधकाम पूर्ण केलं.
बचुटे यांचा स्तुत्य उपक्रम बघून शासकीय अधिकाऱ्यांनीही कौतुकही केलं. परिथितीचा विचार न करता शौचालय बांधण्याची मन:स्थिती झाली आणि त्यातून हे काम पूर्ण झालं. सध्या बचुटे यांच्या या कामाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement