एक्स्प्लोर
चोरी फत्ते झाल्याच्या आनंदाने नाचला, अन् अलगद पोलिसांच्या हाती लागला
कोणतेही काम तडीस गेले गेले की स्वाभाविकपणे आपल्याला त्याचा आनंद होतोच. काम जितके मोठे तेवढा आनंदसुद्धा जास्तच असतो. पण हाच आनंद एका चोराच्या अंगलट आला आहे.
बीड : कोणतेही काम तडीस गेले गेले की स्वाभाविकपणे आपल्याला त्याचा आनंद होतोच. काम जितके मोठे तेवढा आनंदसुद्धा जास्तच असतो. पण हाच आनंद एका चोराच्या अंगलट आला आहे. कारण चोरी झाल्यानंतर नाचणारा चोर एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला.
दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील जालना रोडलगत राहणारे होलसेल व्यापारी महावीर मुथा यांच्या घराशेजारील गोडाऊनमधून 6 लाख 90 हजार रुपये किंमतीचा सिगारेट चोरी झाल्याचे उघड झाले होते. बिलाल अब्दुल रज्जाक (21) या सराईत चोराने ही चोरी केली होती.
बिलाल बीड शहरातील बुंदेलपुरामधील गोवराई भागात राहतो. परिसरात त्याची पानटपरी आहे. पानटपरीवर विकण्यासाठी त्याने सिगारेट चोरी केल्याचे उघड झाले आहे. चोरीचा मुद्देमाल गेवराई येथील त्याच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आला आहे.
चोरी केलेले बॉक्स गाडीमध्ये ठेवल्यानंतर चक्क मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त करताना चोराने डान्स केला. त्याच्या नृत्याची दृष्य शेजारच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
हा चोर इतका सराईत होता की, चोरी करताना त्याने तोंडाला मास्क लावले होते, हातात हातमोजे घातले होते. इतकेच नाही तर सीसीटीव्हीपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने छत्रीचाही वापर केला. परंतु चोरी झाल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की, तो सीसीटीव्हीसमोरच नाचला आणि थेट तुरुंगात पोहोचला.
हा चोर ज्या होलसेल व्यापाऱ्याकडून सिगारेटचा माल घ्यायचा, त्याच्याच गोडाऊनची बनावट (ड्युप्लिकेट) चावी बनवली. शेजाऱ्यांच्या गाडीची चावी चोरली. त्यानंतर त्याने गोडाऊनमधील 7लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी करताना त्याने एकही पुरावा मागे सोडला नव्हता. परंतु सीसीटीव्हीसमोर नाचण त्याला महागात पडलं आहे.
2.10 मिनिटांपुढे व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement