सोलापुरात ऑक्सिजनचा तुटवडा नाही; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून स्पष्ट
सोलापुरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर : सोलापुरात देखील मागील काही दिवसांपासून ऑस्किजनचा तुटवडा असल्याची चर्चा सुरु होती. मंत्री जयंत पाटिल यांना देखील सोलापुरातून यांसदर्भात काही जणांनी फोन केला होता. मात्र, जिल्ह्यात आता कोणताही ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोशल मीडियावर सोलापुरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या बातम्या फिरत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रुग्णालय प्रशासन आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत शासकीय रुग्णालय आणि एका खासगी व्यतिरिक्त इतर खासगी आणि सहकारी हॉस्पीटलमध्ये तुटवडा असल्याचं समोर आलं. सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात कर्नाटकातून नियमित ऑक्सिजन पुरवठा होत असतो. मात्र, मागणी वाढल्याने कर्नाटकातील कंपनीने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्यास नकार दिला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन उपलब्ध करुन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी चिंचोळी एमआयडीसी येथील अर्निकेम इंडस्ट्रीज, एल. आर. इंडस्ट्रीज आणि टेंभूर्णीतील ए. एस. बॅग्स व फिल्टर्स या तीन आस्थापना अधिगृहीत करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. येत्या एक ते दोन दिवसात या कंपनी पुरवठा करण्यात सुरुवात करतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
अंधश्रद्धेचा कळस.... बार्शीत चक्क कोरोना देवीची प्रतिष्ठापना!
जिल्ह्यात औषधांचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी
तर जिल्ह्यात औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी दिली. सोलापुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास 298 रेमेडीसिवीर औषधांचे डोस शिल्लक आहेत तर फेव्हिपॅरिविर या औषधाचे जवळपास 21 हजार डोस शिल्लक आहेत. टोसिलीझुआम्ब औषधाची मात्र मोठी कमतरता केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात आहे. टोसिलिझुआम्बचे केवळ 10 डोस शासकीय रुग्णालयात शिल्लक आहेत. टोसिलिझुआम्ब निर्मिती करणाऱ्या कंपनीने कोव्हिडसाठी उपचार करण्यासाठी औषध नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्याकडे असेललं सप्टेंबरला एक्सपायरी होणारा स्टॉक देण्यात आला आहे. मात्र, यापुढे टोसिलिझुआम्बचे उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे देखील जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी सांगितले.
सोलापुराती कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय रुग्णालयात 100 बेडचे आणखी एक हॉस्पीटल तयार करण्यात आले आहे. 26 जुलै रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या नवीन हॉस्पीटलचे उद्घान देखील झाले. या हॉस्पीटलचे आता पर्यंत 80 बेडचे हे कार्यरत होऊ शकले आहे. मात्र, आयसीयु असलेले 20 बेड हे अद्याप सुरु होऊ शकलेले नाहीये. आयसीयुच्या 20 बेडसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होऊ न शकल्याने आतापर्यंत हे बेड कार्यान्वित झालेले नाहीये. मनुष्यबळ भरतीसाठी जाहिरात देऊन देखील अद्याप भरती झाली नसल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.
सोलापूरकरांवर कोरोनाच्या संकंटात उपकराचा भार, 600 ते 18 हजारांपर्यंत उपकर