एक्स्प्लोर

अंधश्रद्धेचा कळस.... बार्शीत चक्क कोरोना देवीची प्रतिष्ठापना!

कोरोनाचा बिमोड करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे. शासन देखील तितकीच मेहनत कोरोनाचं संकंट दूर करण्यासाठी घेत आहे. मात्र अंधश्रद्धेची महामारी ही देखील घातक असल्याचं वारंवार सिद्ध होतंय

सोलापूर : सोलापुरातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागातील सर्वाधिक मृत्यू हे बार्शी तालुक्यातील आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. तर दुसरीकडे अंधश्रद्धांना पेव फुटलं आहे. त्याचाच भाग म्हणजे बार्शीतल्या पारधी वस्ती येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या देवीला खुश करण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती देखील पारधी वस्तीतील स्थानिक नागरिकांनी दिली. बार्शी-सोलापूर रोडवर ही पारधी वस्ती आहे. या देवीची पुजा केल्याने कोरोनाची बाधा होत नाही अशी अंधश्रद्धा येथील स्थानिक नागरिक करत आहे.

कुठे टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून तर कुठे लहान गोलसर दगड ठेवून त्यालाच कोरोना देवी समजून पुजा केली जात आहे. एका ठिकाणी अनेक फोटो असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोरोनाआईची स्थापना व पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले असून देवीच्या अशा पद्धतीने सेवा केल्याने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.

पाराबाई भगवान पवार यांनी आपल्या घरातील देवघरात लिंबू आणि इतर साहित्य ठेवून कोरोना देवीची प्रतिष्ठापणा केली आहे. "देवीच्या कृपेमुळे आम्हाला सर्दी, खोकला किंवा कसला त्रास नाहीये. इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली असून देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही." अशी प्रतिक्रिया दिली. तर कोरोनाचा काळात अहोरात्र कार्य करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रावर एका प्रकारे अविश्वास देखील त्यांनी बोलताना व्यक्त केला. "कोरोनामुळे मयत झाल्यावर हात लावू देत नाही, पॅक करून देता, किडण्या काढून घेतात की काय हे माहित पडत नाही" अशी प्रतिक्रिया पाराबाई पवार यांनी दिली.

पाराबाई सारखीच भावना पारधी वस्तीतील अनेक नागरिकांच्या आहेत. काही जणांना वाटतं की कोरोना देवीमुळे कोरोना पासून रक्षण होत आहे, तर काही जणांना वाटतं की या देवी मुळे कोरोनातून सुखरुपपणे आपण बाहेर पडलो. तर देवी साठी चक्क बळी देखील जात असल्याची भावना देखील यावेळी काही जणांनी बोलून दाखवली. याच परिसरात राहणाऱ्या कमलाबाई रोहिदास पवार यांनी देखील या देवीची स्थापना चक्क रस्त्यावरच केलीय. एका दगडात कमलाबाईंना कोरोना आईचं दर्शन होतंय. तर आम्ही तिला मरेपर्यंत माननार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरू आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

माणसाचे मन भावनिकतेने विचार करते. त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समिती सदस्य विनायक माळी यांनी दिली. "कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले आहे. यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले. कोरोनाच्या नावाखाली कोणी अंधश्रध्दा पसरवत असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या अंधश्रध्देचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, आरोग्यासाठी कोरोना रोगाचे मार्गदर्शन झाले पाहिजे." अशी प्रतिक्रिया अंधश्रध्दा निर्मूलन समिती सदस्य विनायक माळी यांनी दिली.

दरम्यान या बाबत आम्ही मानसोपचार तज्ज्ञांशी देखील संवाद साधला. सध्या कोरोना प्रादुर्भावमुळे सगळीच माणसे चिंताग्रस्त झाली असल्याचे दिसून येते. यातूनच नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. या भावनिक अस्थिरतेतून काही जण अंधश्रेद्धेचे बळी पडत आहेत. प्राप्त परिस्थिती स्विकारत सकारत्मक विचार करावा. शासनाने आखून दिलेले नियम नागरिकांना पाळणं महत्वाचं असल्याचं मत बार्शीतील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.महेश देवकते यांनी व्यक्त केलं.

कोरोनाचा बिमोड करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे. शासन देखील तितकीच मेहनत कोरोनाचं संकंट दूर करण्यासाठी घेत आहे. मात्र अंधश्रद्धेची महामारी ही देखील घातक असल्याचं वारंवार सिद्ध होतंय. केवळ शिक्षणाच्या अभावामुळेच बार्शीतल्या पारधी वस्तीतील काही नागरिक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. त्यामुळे कोरोनासोबत अंधश्रद्धेपासून देखील बचाव करण्यासाठी शासन आणि प्रशासकीय यंत्रणांना प्रयत्न करावे लागणार आहे.

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget