एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच : संजय राऊत

महाराष्ट्रातल्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार यावरुन आधीच रणकंदन माजलेलं असताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार आहेत. भाजपवर दबाव वाढवण्य़ासाठी राऊतांचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.

मुंबई : "राज्यपालांसोबतची भेट ही राजकीय नसून सदिच्छा भेट आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यानंतर, संजय राऊत आज (4  नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. तसंच तरुण भारत वृत्तपत्र वाचत नसल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. "राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वेळ आम्ही घेतली आहे. ही सदिच्छा भेट आहे. राज्यपाल हे आपल्या सगळ्यांचे पालक आहेत. त्यांना शुभेच्छा देणार आणि आशीर्वाद घेणार आहे. या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहता सदिच्छा भेट म्हणून पाहावं. कोश्यारी हे अनुभवी नेते आहेत. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्यासोबत काम केलं आहे. निवडणूक झाली, निकाल आला, यादरम्यान त्यांची भेट होऊ शकली नाही. मी उद्धव ठाकरेंशी बोललो आहे. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच," असं संजय राऊत म्हणाले. 'तरुण भारत वृत्तपत्र आहे हे माहित नाही' 'सामना'तून भाजपवर होणाऱ्या टीकेला 'तरुण भारत' वृत्तपत्रातून उत्तर देण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री काही वृत्तपत्र वाचत नाहीत, तसंच मी 'सामना'शिवाय दुसरं काही वाचत नाही. एवढी वृत्तपत्र येतात, कुठे वाचणार. अशाप्रकारचं वृत्तपत्र आहे हे मला माहित नाही." तरुण भारतमध्ये संजय राऊतांवर टीका राज्यपालांकडे ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच : संजय राऊत उद्धव ठाकरेंची राजकीय समज, त्यांची परिपक्वता, समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांना वेदनादायी आहे. या एका 'बेताल'च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणला येईल? रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी 9 वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवश मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची? संजयने दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण संजयच धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राने चिंतीत होणं स्वाभाविक आहे. 'बेताल' जर खांद्यावरुन उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात ज्या फांदीवर बसलो आहोत, कापणाऱ्याला लाकूडतोड्या नाही तर 'शेखचिल्ली' म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget