एक्स्प्लोर
सासूबाईंच्या पैशांवर डल्ला मारणारा जावई गजाआड
जळगाव: कर्जबाजारी जावयानं आपल्या मित्रांच्या मदतीने सासूच्याच पैशांवर डल्ला मारल्याची घटना जळगावात घडली आहे. अर्शद शेख असं या जावयाचं नाव असून, त्याला स्थानिक पोलिसांनी अटक करून अवघ्या पाच तासातच 10 लाखाची रोकडही परत मिळवली आहे.
जळगावच्या जिल्हा पेठ परिसरात एका उद्यानापाशी शेख अर्शद शेख सलीम याच्या सासूजवळची दहा लाखांची रोकड लांबवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही चोरी खुद्द अर्शद शेख यानंच घडवून आल्याचं उघड झालं.
इस्टेट ब्रोकर असलेल्या अर्शद शेखवर 20 लाखाचं कर्ज होतं. ते फेडण्यासाठी सासूकडे पैशांची मागणी करूनही ती देत नसल्यानं, हैराण झालेल्या अर्शद शेखनं आपल्या मित्रांच्या मदतीनं हा चोरीचा प्लॅन आखला. मात्र, पोलीस तपासात अर्शदच्या जबाबात विसंगती आढळली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी चोरांसह 10 लाखांची रक्कमही परत मिळवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement