![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : शहराच्या भिंती बोलक्या करणारे नागपुरातील चित्रकारांचा सन्मान
Nagpur : 'वॉल पेंटिंग स्पर्धे'च्या व्यावसायिक चित्रकार गटात प्रशांत कुहीटे आणि विद्यार्थी गटात दर्शन देवते आणि समूह यांनी साकारलेल्या कलाकृतींना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
![Nagpur News : शहराच्या भिंती बोलक्या करणारे नागपुरातील चित्रकारांचा सन्मान The painters of Nagpur who made the walls of the city speak through wall painting are honored Nagpur News : शहराच्या भिंती बोलक्या करणारे नागपुरातील चित्रकारांचा सन्मान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/da2aa1c962008c7cbead7818421229751673533226867440_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : आपल्या कल्पकतेतून शहरातील विविध इमारतींच्या भिंतींना अधिक सुशोभित करून, निर्जीव भिंती बोलक्या करणाऱ्या शहरातील विविध व्यावसायिक आणि विद्यार्थी चित्रकारांचा नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) वतीने सन्मान करण्यात आला. डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या 'वॉल पेंटिंग स्पर्धे'च्या (wall painting competition) व्यावसायिक चित्रकार गटात प्रशांत कुहीटे आणि विद्यार्थी गटात दर्शन देवते आणि समूह यांनी साकारलेल्या कलाकृतींना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही वॉलपेंटिंग स्पर्धा म्हणजे नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याच्या संकल्पपूर्तीची आरंभ ज्योत असल्याचे प्रतिपादन मनपा (NMC) आयुक्तांनी राधाकृष्णन बी. यांनी केले.
‘शून्य कचरा’ कार्यक्रम
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्याच्या उद्देशाने 'शून्य कचरा' ही संकल्पना या भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात यशस्वीरित्या राबविण्यात आली. कार्यक्रमात कचरा होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली, हा संपूर्ण कार्यक्रम ‘शून्य कचरा’ कार्यक्रम ठरला. कार्यक्रमात प्लास्टिक ऐवजी मातीच्या कुंडीत तुलसीचे रोपटे देवून अतिथिंचा सत्कार करण्यात आला. तसेच चहा सुध्दा मातीच्या पेल्यात आणि काचेच्या ग्लासमध्ये देण्यात आला. नागरिकांनी देखील आप-आपल्यापरीने शून्य कचरा संकल्पना राबवावी असे आवाहन आयुक्तांनी केले. यासाठी उपस्थितांनी मनपाचे कौतुक केले.
पुरस्कार प्राप्त व्यावसायिक चित्रकार
प्रथम - प्रशांत श्याम कुहिटे आणि टीम
व्दितीय - सदानंद दादाराव चौधरी आणि टीम
तृतीय - कृष्णकुमार दाभेकर, अतुल ठाकरे
प्रोत्साहनपर - दिनेश निळकंठराव गुडधे, आशिष शि. भेलांडे, शैलेश एस. बोदेले, अजय दा. कान्हेरे, वैशाली फटींग, अपर्णा राजवैद्य, सिधांत अशोक डोंगरे, किशोर काशिनाथ सोनटक्के, आशिष से. पलेरिया, गौरव संतोष सुरदास
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गट
प्रथम - दर्शन देवते, केशव भगत, गौरव नगराळे, मयुर सिरसाठ
द्वितीय - प्रज्वल बुले, पूर्वा शिरके, नेहा मालोदे, आशिष कुरील, नेहा पाटील
तृतीय - मिनेश व्ही. प्रजापती, श्रृति पी. भावसार, संस्कृती इंगळे, आकाश चव्हाण, द्युषंत रेलकर
प्रोत्साहनपर - खुशाली बांते, जनुश्री शाहू, वाणी चौरे, निश्चला खांडेकर, भानुप्रतापे साहू, साहिल बालपांडे
प्रोत्साहनपर - अनुराग आर. मानकर, चंद्रकांत तायडे, यश एन. भोगले, बॉबी एस. बारई, वैष्णवी दांडेकर, साक्षी एस. घायसुंदर
प्रोत्साहनपर - पुजा बोडखे, सेजल शाहू, रुचि मेश्राम, प्रज्ञा मेश्राम
प्रोत्साहनपर - भुपेंद्र कवडते, रोहीनी दुपारे, आकांक्षा हेडाऊ, पूर्वा मेंडजोगे, शशी गुप्ता
प्रोत्साहनपर - पुनम सुभाष वट्टी, बालचंद देवचंद राऊत, आनंद पंढरीची शेंडे, तेजस सुरेशराव पांडे
प्रोत्साहनपर - सानिया सिंग, विजया बाबरे, रुतुजा धांडे, सिद्धी फुंडे, वैशाली पुसम, विशाखा झोडापे
प्रोत्साहनपर - दिक्षा डी. वरखडे, निशा निमगडे, अक्षदा नक्षिने, सयाली दाणी, श्रृतिका बुटे
प्रोत्साहनपर - निखिल आतराम, वल्लभ कौंडीन्य, अमोल बोधने, देवा वैद्य
प्रोत्साहनपर - खुशी अग्रवाल, संस्कृती वरघडे, प्रतिक खापरे
प्रोत्साहनपर - सिद्धि हिंगे, अभिषेक कुमार, सौम्या घुशी, चेतना, नयना, दिव्या देशमुख
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या वॉल पेंटिंग स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आज, गुरुवारी राजे रघुजी भोसले नगरभवन ( टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, चित्रकला स्पर्धेचे परीक्षक सेवानिवृत्त प्राध्यापक नंदकिशोर मानकर, प्रा. प्रभाकर पाटील, चित्रकार प्रकाश बेतावार, युसीएन वृत्तवाहिनीचे संपादक राजेश सिंग, नागपूर@2025 चे मल्हार देशपांडे यांच्यासह मनपाचे सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
ही बातमी देखील वाचा...
नागपूर जिल्हा परिषदेतील पेन्शन घोटाळ्याची व्याप्ती वाढली; गैरव्यवहाराची रक्कम 3 कोटींच्या घरात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)