एक्स्प्लोर
सरकार आमच्या अपेक्षा पूर्ण करणार : पंकजा मुंडे
, राजकारणात येण्यापूर्वी पाण्यावर काम करत आहे. मी भाजप कार्यकर्ता आहे पण समाजसेविका म्हणून काम करणार आहे. मला कोणती लालसा नाही, तुमच्या मनात माझं स्थान आहे ते सर्वोच्च आहे.
औरंगाबाद : पक्षाचे जोडे बाजूला ठेवून उपोषण करण्याचं मी आवाहन केले होते. मला कोणावर टीका करायची नाही. उपेक्षा नाही तर अपेक्षांचे हे उपोषण आहे. आम्हाला पाणी दिले तर कर्जमाफी कर्जमुक्ती करायची गरज नाही. मराठवाड्यात एक कॅबिनेट घेऊन मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारकडे केले आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलं काम करतील असाही विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ठाकरे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजप नेते पंकजा मुंडे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर पंकजा मुंडे उपोषणाला बसल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी मराठवाड्यातील भाजप नेत्यांसह देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते. पंकजा मुंडे मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीचं काम पुढे घेऊन जात आहेत, अशा शब्दात फडणवीसांनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात येण्यापूर्वी पाण्यावर काम करत आहे. मी भाजप कार्यकर्ता आहे पण समाजसेविका म्हणून काम करणार आहे. मला कोणती लालसा नाही, तुमच्या मनात माझं स्थान आहे ते सर्वोच्च आहे. मला अमेरिका राष्ट्राध्यक्ष दिलं तरी मला ते नको. सरकार येऊन शंभर दिवस झाले नाही तोच उपोषण केलं. माञ सरकारनं स्वप्न पूर्ण करावं, शेतात पाणी आल्यावर तो आत्महत्या करणार नाही, त्याला कर्जमाफीची गरज नाही.
'पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस पाहून डोळे दिपतात मात्र आमच्याकडे पाणी दिसत नाही. येथील लोक रोजगारासाठी स्थलांतर करत आहेत. काही म्हणतात तुम्ही काय केलं, मला कोणाचा राग, लोभ नाही. मी समाजसेविका आहे. सरकार विरोधी उपोषण नाही तर लक्ष वेधून घेण्यासाठी उपोषण केल आहे', असे पंकजा मुंडे यांनी सांगितल.
मराठवाड्यात एक कॅबिनेट घेतली तर मराठवाड्याला न्याय मिळेल. आम्ही कॅबिनेट घेऊन काम केले आहे. मराठवाड्याला न्याय द्या. मराठवाड्यातील जनतेने शिवसेनेला भरपूर दिलं त्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केल आहे. मला अपेक्षा आहे उद्धव ठाकरे मराठवाड्यात कॅबिनेट घेतील. संवेदनशील मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील नाहीतर आंदोलन आहे. काहीजण बातमीसाठी बोलत असतात. एखद्या पराभवाने खचून जाणार नाही. मी एका तालुक्याची नाही तर राज्याची आहे. सरकार संधीच सोने करेल भविष्यात रस्त्यावर उतरू देणार नाही असे वाटते, असे पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement