Sharad Pawar NCP : अजितदादांचा 'तो' प्रस्ताव फेटाळताच प्रफुल पटेलांसह इतरांची नाराजी; शरद पवार गटाकडून पटेलाच्या दाव्यावर प्रत्युत्तर!
Sharad Pawar NCP : अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले असा टीका तपासे यांनी केली.

Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबाबत अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अशा कोणत्याही प्रस्तावाला ठामपणे नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. पटेल यांचे विधान मतदारांमध्ये संभ्रम पेरण्याचा हेतुपुरस्सर केलेला प्रयत्न असल्याची टीका महेश तपासे यांनी केली आहे.
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. महाराष्ट्राची निष्ठा शरद पवार यांच्यावर आणि राज्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या विचारांवर कायम आहे. महाराष्ट्र आगामी निवडणुकांच्या तयारीत असताना, लोकहितासाठी, समतेसाठी व इतर मूलभूत अधिकाऱ्यांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही तपासे म्हणाले.
प्रस्ताव नाकारल्याने अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतरांची निराशा
महेश तपासे म्हणाले की, शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती. ही कृती शरद पवारांच्या राजकीय विचारांच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. पाठिंबा देण्याचा प्रस्ताव नाकारल्याने अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतरांसाठी निराशाचे कारण झाले. ही मंडळी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात प्रासंगिकता राखण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वावर अवलंबून आहेत असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे. तपासे पुढे म्हणाले की, अजित पवार गटाच्या नेत्यांच्या सर्व चौकशा आता बंद झाल्या आहेत. अनेक प्रकरण थंड बस्त्यात पडली आहेत व हेच भाजपसोबत जुळवून घेण्याचे प्रमुख कारण होते. भाजपसोबत जाण्यात विकासाचा कुठलाच मुद्दा नव्हता.
काय म्हणाले होते प्रफुल पटेल?
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गेल्यावर्षी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते महाराष्ट्र सरकारसोबत जाण्यासाठी 50 टक्के तयार होते, असा दावा केला होता. गेल्यावर्षी 2 जुलै रोजी, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली जेव्हा ते आणि आठ मंत्री महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये सामील झाले होते. पटेल यांनी ANI ला सांगितले की, "2 जुलै 2023 रोजी अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. 15 आणि 16 जुलै रोजी आम्ही शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आमच्यात सामील होण्यासाठी विनंती केली. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे असे सांगितले. नंतर, अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. तेव्हा शरद पवार 50 टक्के तयार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याला अर्थहीन असल्याचे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
