कर्जबाजारी इंजिनीअर मुलाची घरातच चोरी, औरंगाबाद येथील घटना
टपरी चालकाने पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने दिनेशने आपल्या मित्रांच्या मदतीने सोनं, चांदी ,रोख रक्कमेसह पावणे दोन लाखांची आपल्याच घरी चोरी केली.
औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने औरंगाबादेत मुलानेच आपल्या घरात मित्राच्या मदतीने चोरी केली. चोरलेलं सोनं मन्नपुरम गोल्ड येथे ठेऊन पैसे ही उचलले. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून चोरीचा बनाव करत पोलिसांत तक्रारही दिली.
पोलिसांच्या ताब्यात असलेले हे तीनही तरुण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. दिनेश शिंदे, सुमित प्रसाद आणि कृष्णा लखाणे या तिघांना चोरीच्या गुन्ह्यात पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे दिनेश शिंदेने आपल्याच घरात चोरी करून चोरीचा बनाव केला आहे. दिनेशने आपल्या मित्रांसोबत मजा मस्ती करण्यासाठी एका टपरी चालकाकडून मित्राच्या मदतीने 60 हजार रुपये उसने घेतले होते. टपरी चालकाने पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने दिनेशने आपल्या मित्रांच्या मदतीने सोनं, चांदी ,रोख रक्कमेसह पावणे दोन लाखांची आपल्याच घरी चोरी केली.
दिनेशने चोरी केलेला सोनं मन्नपुरम गोल्डमध्ये ठेवलं. त्यातून पैसे उचलले आणि हा सगळा प्रकार समोर येऊ नये म्हणून आपल्या घरात चोरी झाल्याचा बनाव केला. घरातलं सामान अस्ताव्यस्त फेकलं दाराचं कुलूप तोडलं आणि गावी निघून गेला. शेजाऱ्याचा फोन आला तेव्हा आई सोबत पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठीही गेला. हे तीनही तरुण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. मौजमजा करण्यासाठी उसने घेतलेले पैसे परत देता आले नाही म्हणून त्यांनी चोरी करत चोरीचा बनाव केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे इंजिनीअरिंग शिकता शिकता चोरीचं केलेलं हे असं संशोधन त्यांच्या अंगलट आलं आणि त्यांच्या हातात बेड्या पडल्या.
मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी ही बातमी पाहा; सायबर गन्हेगारांचा गंडा, 8 लाख 95 हजारांचा फटका