एक्स्प्लोर
रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत कुख्यात गुंड मयुर शिंदे भाजपमध्ये
ठाणे : शिवसेनेनं एकीकडे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असताना 'पार्टी विथ डिफरन्स' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपनं पुन्हा एका गुंडाला पवित्र करुन घेतलं आहे. कुख्यात गुंड मयुर शिंदेला भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ठाणे आणि मुंबईत गंभीर गुन्हे नावावर असलेला गुंड मयुर शिंदेने शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिंदेच्या पक्षप्रवेशाला राज्यमंत्री रविंद्र चव्हाण जातीनं हजर होते. शिंदेला शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानं त्यानं भाजपची वाट धरली. शिंदेवर एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानंही गुन्हा दाखल झाला आहे.
विठ्ठल शेलार आणि पवन पवार सारख्या गुंडांना पक्षात एन्ट्री मिळाल्यानंतर भाजपवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. त्यानंतरही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुधाकर चव्हाणला पक्षात प्रवेश देण्यात आला. सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा चव्हाणांवर नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव आहे. शिवाय नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका ठेवला होता. त्यामुळे अशा लोकांना फक्त पक्ष वाढवण्यासाठी का घेतलं जातंय, असा सवाल विचारला जात आहे.
भाजपने पक्षात स्थान दिलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते
पवन पवार :
- खून, खंडणी, जमीन बळकावणे अशा गंभीर स्वरुपाच्या 15 गुन्ह्यांची नोंद
- पोलीस हवालदाराचा खून केल्याप्रकरणात पवन पवार मुख्य आरोपी
- नगरसेवक झाल्यावरही प्रभाग सभापती असताना खंडणी प्रकरणी जेलची हवा
- खंडणी, हत्या आणि मारामारी करुन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा नोंद
- तुरुंगातच कुख्यात बाबा बोडके यांच्यासोबत धावडेची ओळख झाली
- कनिष्ठ न्यायालयाने पिंटू धावडेची निर्दोष मुक्तता केली
- 2012 साली राष्ट्रवादीने अप्पर इंदिरानगरमधून उमेदवारी दिली, नगरसेवक म्हणून निवड झाली.
- पोलिसाला मारहाण करणं, दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची नोंद
- 20 जूनला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- 37 दिवस येरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे बाहेर
- विधीमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा पक्षप्रवेश पार पडला
- 2008 पासून विठ्ठल शेलारवर तब्बल 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद
- 2010 आणि 2012 मध्ये हत्येचे दोन गुन्हे शेलारवर दाखल
- 14 फेब्रुवारी 2012 ला दत्तात्रय तिकोणे आणि ज्ञानेश्वर कांबळेचं अपहरण करुन पिरंगुटच्या जंगलात हत्या केल्याचा आरोप
- दोघांचेही मृतदेह घोटवडे गावाजवळील दगडखाणी जाळून राख नदीत फेकल्याचा आरोप
- अडीच महिन्यांपूर्वी शेलारकडून दोन पिस्तुल जप्त करुन अटक करण्यात आली
- 2014 मध्ये विठ्ठल शेलारवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement