अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर दबाव, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक : सुषमा अंधारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sushma Andhare : एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव, टाळ्या सुरु असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अचानक मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा इगो सोडून महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ असं बोलणाऱ्यांना नक्कीच महाराष्ट्र प्रश्न विचारेल असे अंधारे म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर दबाव आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ही बैठक असू शकते असेही अंधारे म्हणाल्या.
शिवसेनाला एवढं सोप्प समजू नये
ज्या हॉटेलमध्ये ही भेट झाली ते मातोश्रीवरून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. ज्याची वाट मातोश्रीच्या समोरूनच जाते असे अंधारे म्हणाल्या. आमच्या घराची थोडी पडझड काही झाली देवेंद्र फडणवीस यांनी येण्या जाण्याचा रस्ताच बनवल्याचे अंधारे म्हणाल्या. शिवसेनाला एवढं सोप्प समजू नये असेही अंधारे म्हणाल्या. जशा इतर भेटी होत असतात तसेच मी या भेटीकडे बघते असे अंधारे म्हणाल्या. फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मनसे प्रमुख एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत. स्वतंत्र पक्षाच्या नेत्याला काही महाराष्ट्राचे प्रश्न पडले असतील तर मुख्यमंत्र्यांकडून काही प्रश्न उत्तर हवे असतील तर भेटले असतील असे अंधारे म्हणाल्या.
भाजपला भीती आहे की, दोन ठाकरे एकत्र आले तर...
दोन्ही नेत्यापैकी एक नेता समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपण अधिकृत भाष्य करणे उचित ठरत नाही असेही अंधारे म्हणाल्या. भाजपला भीती आहे की, दोन ठाकरे एकत्र आले तर, पण आम्ही साद घातली आहे त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावे असे अंधारे म्हणाल्या. या सगळ्या घडामोडीत भाजप शिंदे अस्वस्थ होणे उचित आहे. या सगळ्यात इच्छाशक्तीचा प्रश्न असतो. आम्ही आमच्याकडून जो प्रतिसाद द्यायचा आहे तो दिला आहे. युतीबाबत मनसेच्या आलेल्या प्रतिक्रिया दुःख करणाऱ्या आणि वेदना करणाऱ्या होत्या असे अंधारे म्हणाल्या.
आमच्याकडे प्रचंड संयम
भाजपला दोन ठाकरे एकत्र येणे परवडणार नाही, भाजप कोणाशीच एकनिष्ठ नाही. त्यांची कोणासोबत बांधीलकी नाही. त्यांच्या सत्ता पक्षात असणारे अजित दादा किंवा शिंदे साहेब या सगळ्या लोकांना एका अर्थाने धमकावणे किंवा अप्रत्यक्ष इशारा देणे या अर्थाने सुद्धा ही भेट असू शकते. फार आवाज करु नका. फडणीसांनी स्व पक्षातील शिंदे आणि दादा यांना इशारा देण्यासाठी ही कृती केली असेल का? असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला. आमच्याकडे प्रचंड संयम आहे. शिवसेना काही खाणार नाही, शिवसेनेने स्वतःचा दर्जा राखला आहे, अभिजातपणा आम्ही जपला आहे असे अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:

























