एक्स्प्लोर
Advertisement
युती तोडल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमनेसामने
युतीतल्या ब्रेकअपनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आमने सामने आले. पुण्यातल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी मोदी पुण्यात दाखल झाले.
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
युतीतल्या ब्रेकअपनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आमने सामने आले. पुण्यातल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी मोदी पुण्यात दाखल झाले. प्रोटोकॉलनुसार नुसते स्वागताचे सोपस्कर उरकुन उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईला रवाना झाले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त 10 मिनिटंच एकमेकांसोबत होते अशी माहिती मिळतेय. या 10 मिनिटांदरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. विशेष म्हणजे मोदींच्या स्वागतासाठी फडणवीस देखील उपस्थित होते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार संजय काकडे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैसवाल, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, एअर कमांडर राहुल भसीन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग आहुजा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर, गणेश बिडकर आदी उपस्थित होते. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.
देशभरातील पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन यावर्षी पुण्यात करण्यात आलं आहे . या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शहा तीन दिवस पुण्यात मुक्कामाला असणार आहेत . पुण्यातील पाषाण भागातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही तीन दिवसीय परिषद चालणार आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल , गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार , गृविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलीस महासंचालक उपस्थित राहणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement