(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परभणीत मुलाचा लग्न स्वागत समारंभ महागात! दहाजण कोरोना पॉझिटिव्ह
परभणीत कोरोना काळात गंगाखेडच्या जिनिंग व्यावसायिकाला मुलाचा स्वागत समारंभ करणं महागात पडलंय. या काळात दहाजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या तपासण्यासाठी लागलेला खर्चही या व्यावसायिकाकडून प्रशासन वसूल करणार आहे.
परभणी : कोरोनाचा फैलाव होऊन रुग्ण वाढू नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार कुठलेही धार्मिक समारंभ, लग्न समारंभ राजकीय सभा घेण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. असे असताना परभणीच्या गंगाखेड येथील जिनिंग व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ आपल्या जिनींग मध्ये घेतला आणि यानंतर या ठिकाणी दहा जण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने आता या जिनिंग चालकावर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून या रुग्णांत संदर्भात लागलेला सर्व खर्च वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील जिनिंग व्यवसायिक राधेशाम भंडारी यांच्या मुलाचा विवाह लातूर येथे झाला. त्यानंतर त्यांनी 28 जून रोजी गंगाखेड येथील त्यांच्या महेश जिनिंग येथे स्वागत समारोह घेतला. हा स्वागत समारोह पार पडल्यानंतर यातील 10 जण पॉझिटिव्ह झाले. यानंतर गंगाखेड शहर आणि तालुक्यातील अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील रुग्णांची संख्या आज वीस ते बावीस वर पोहोचली आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मंगल कार्यालय बंद असताना लग्न समारोहास परवानगी नसताना अशा प्रकारे स्वागत समारोह घेतल्याने राधेश्याम भंडारी यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 860 ची कलम 188 चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
पॉझिटिव्ह रुग्णांचा खर्च करावा लागणार गंगाखेड येथे या काळात झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लागणारा खर्चही या व्यावसायिकाकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहे. याचीही कारवाई तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिली.
लग्नासाठी सरकारकडून नियमावली कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने लग्न समारंभ करताना काही नियम व अटी दिलेल्या आहेत. त्यानुसार लग्न समारंभासाठी वधु-वरांसह 50 वऱ्हाडी मंडळींना परवानगी देण्यात आली आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क बंधनकार असणार आहेत. कंटेनमेन्ट झोनमध्ये लग्न समारंभ करण्यास बंदी आहे.
Coronavirus in Mumbai | मुंबईत महिन्याभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9 टक्क्यांनी घसरला