Vidarbha Temperature | विदर्भाचे तापमान चाळीशीपार, चंद्रपुरात पाचव्यांदा राबवणार हिट अॅक्शन प्लॅन'
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उकाड्याची झळ बसत आहे. दरवर्षी चंद्रपूर येथे सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका पाचव्यांदा 'हिट अॅक्शन प्लॅन' राबविणार आहे.
अकोला : विदर्भ आता जोरदार तापायला सुरूवात झाली आहे. काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विदर्भातील जवळपास सर्वच शहरांनी तापमानाची चाळीशी ओलांडली आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीत सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला आणि चंद्रपूरचा पारा 42.8 अंशांवर होता
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उकाड्याची झळ बसत आहे. दरवर्षी चंद्रपूर येथे सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका पाचव्यांदा 'हीट ऍक्शन प्लॅन' राबविणार आहे. सध्या लॉकडाउनमुळे रस्ते ओस पडले आहेत
शहर तापमान (सेल्सिअस अंशांमध्ये)
अकोला 42.8
अमरावती 41.8
बुलडाणा 40.0
ब्रम्हपूरी 43.3
चंद्रपूर 42.8
गडचिरोली 38.0
गोंदिया 40.8
भंडारा 39.0
नागपूर 41.5
वर्धा 42.0
वाशिम 39.2
यवतमाळ 42.5
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहातं. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात. कॉटनचे कपडे शक्यतोवर हलक्या रंगांचेच असावेत.