शिंदे साहेब तारीख-वेळ सांगा, किती मावळे, जेसीबी पाहिजे ते सांगा, भाषणबाजी नको- आमदार टी राजासिंह
औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे. राजकीय नेतेदेखील यावर व्यक्त होत आहेत. यावरच आता टी राजासिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

T Rajasingh : बादशाहा औरंगजेबाची कबर Aurangzeb Tomb) हटवून टाकावी अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन सध्या अनेक संघटना निदर्शनं आणि आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणातही हा विषय केंद्रस्थानी आला असून अनेक नेत्यांनीही ही कबर लवकरात लवकर हटवून टाकावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्याला घेऊन तेलंगणातील आमदार टी राजासिंह (T Rajasingh) यांनीदेखील आकर्मक भूमिका घेतली आहे. फक्त भाषणबाजी नको आता तारीख आणि वेळ सांगा. मी मावळे आणि जेसीबी घेऊन येतो, असं त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटलं आहे.
टी राजासिंह नेमंक काय म्हणाले?
"आज महाराष्ट्रात जे सरकार बनले आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांमुळे बनलेले आहे. सगळे नेते वेगवेगळी भाषा बोलत आहेत. नेत्यांना मारा गोळी, आता मावळ्यांचा संयम सुटत चालला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले औरंगजेबची कबर काढून टाकू. शिंदे साहेब तारीख आणि वेळ सांगा, किती मावळे पाहिजे किती जेसीबी पाहिजे ते सांगा, पण आता भाषणबाजी नको, असे टी राजासिंह म्हणाले. औरंगजेबची कबर टीकवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, असं ते म्हणाले.
इमारतीवर चढून मावळे नावात बदल करतील
त्यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नााव बदलावे अशी मागणीदेखील केली आहे. "देवा भाऊ शिवाजी विद्यापीठाचे नाव तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात बदल करेल त्यांचा इतिहास बदलून टाकू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे. नाहीतर माहीत आहे की विद्यापीठाच्या इमारतीवर चढून मावळे नावात बदल करतील" असेही ते म्हणाले.
कॉलेज, रुग्णालय तयार केलं जाईल
पुढे बोलताना त्यांनी वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनीचाही मुद्दा उपस्थित केला. "1947 साली वक्फकडे 30 हजार एकर जमीन होती. हीच जमीन 9 लाख 60 हजार एकर कशी झाले, हेच केंद्र सरकार विचारत आहे. पण आता ही जमीन काढून घेतली जाईल. याच ठिकणी कॉलेज, रुग्णालय तयार केलं जाईल. देवाभाऊ यांच्यावर आमचा विश्वास आहे," असे ते म्हणाले.
हेही वाचा :
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

