एक्स्प्लोर
पगारावरुन शिक्षक-मुख्याध्यापक भिडले, शाळेतच एकमेकांची धरली कॉलर
घडल्या प्रकारानंतर यावर वरिष्ठ आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात पगारावरून जोरदार वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की दोघांनी एकमेकांची चक्क कॉलर धरली. हा सर्व प्रकार शाळेतच झाल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा कारभार कसा सुरु आहे हे समोर आलं आहे.
जिंतूर तालुक्यातील भोसी जिल्हा परिषद शाळेतील गव्हाणे आणि रन्हेर या दोन शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक आर एम सोंनेकर यांच्याकडे आमचा अद्याप पगार का केला नाही हे विचारणा केली. यातूनच शिक्षकांचा वाद झाला आणि मग काय दोन्ही गुरुजनांनी एकमेकांचे थेट कॉलर धरले.
एवढंच नाही तर दुसऱ्या शिक्षक महोदयाने याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर वायरलही केला. यामुळे विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांचं नेमक चाललंय काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. घडल्या प्रकारानंतर यावर वरिष्ठ आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement