एक्स्प्लोर

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधा, शिवसेना ठाकरे गट आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

तलाठी भरतीची  सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून सरकारने  भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे. 

मुंबई : तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharti)   पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटीप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुन्हा नव्याने तीन महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray)  गटाचे आमदार कैलास पाटील यांनी  सरकारकडे  केली आहे.  अन्यथा विद्यार्थ्यांसोबत ठाकरे गट रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.  

कैलास पाटील म्हणाले,  तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे. सरकार ही परीक्षा आणि ही सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत असेल तर मग गुन्हे कसे दाखल झाले ? याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकार या सगळ्या प्रकरणात पुरावे विद्यार्थ्यांकडून मागत आहेत हे चुकीचे असून सरकारने ही जबाबदारी घेऊन या सगळ्या मागचा मास्टरमाईंड समोर आणावा, ही आमची मागणी आहे.

ठाकरे गट हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सरकारला इशारा

तलाठी भरतीची  सगळी भरती प्रक्रिया आता रद्द करून सरकारने  भरती परीक्षा घेऊन तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची आता सरकारकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे.  अन्यथा विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे कैलास पाटील म्हणाले.  

तलाठी भरती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत दोनशेहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. तसेच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

राधााकृष्ण विखे पाटलांनी आरोप फेटाळले

तलाठी भरती प्रक्रियेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 पेक्षा अधिक गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा  झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.यावर  राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आरोपात कसलंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे, अधिकाऱ्यांना भरती संदर्भात अधिक माहिती घेण्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. 

हे ही वाचा :

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षेत घोटाळा? विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण; विजय वडेट्टीवारांकडून चौकशीची मागणी

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget