एक्स्प्लोर

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून एका 30 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आपले जीवन संपवल्याची सुन्न करणारी घटना घडली आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून एका 30 वर्षीय तरुणाने नैराश्यातून (Depression) राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची सुन्न करणारी घटना घडली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील जिंतूर (Jintur) तालुक्यातील भोसी (Bhosi) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे यांनी राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

Maratha Reservation: सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवावा

घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचून प्राथमिक पंचनामा केला. या वेळी पोलिसांना गणेश यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. "मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत, सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा," अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Maratha Reservation: गणेश ठोंबरे होते प्रचंड मानसिक तणावात

गणेश ठोंबरे यांचे चुलत भाऊ आणि पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हे मागील दोन-तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत होते आणि त्यावरून प्रचंड मानसिक तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले आहे.

Maratha Reservation: कुटुंबाला शासकीय मदतीची मागणी

मृत गणेश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने, प्रशासनाने आणि सरकारने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी (Government Job) तसेच आर्थिक मदत (Financial Assistance) द्यावी, अशी मागणी भास्करराव ठोंबरे यांनी केली आहे. या घटनेची बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ठाकूर करत आहेत. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेमुळे भोसी गावावर शोककळा पसरली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Vijay Wadettiwar on Manoj Jarange Patil: 'सरकार मनोज जरांगेंपुढे पायघड्या घालतंय, एक दिवस उपोषणाला बसले की...'; विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget