(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कारवाईपासून वाचण्यासाठी मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करा ; मेस्टा अध्यक्ष संजय तायडेंची मागणी
कारवाईपासून वाचण्यासाठी मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करा, अशी मागणी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे (Sanjay Tayde) यांनी केली आहे.
Sanjay Tayde : कोरोना काळात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन म्हणजेच मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांनी 25 टक्के शुल्क कपात केली होती. त्यानंतर शासनाने 15 टक्के शुल्क कपातीचे आदेश दिल्यानंतर मेस्टाने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देखील मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांच्या विरोधात कारवाई केली जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. परंतु, शासनाच्या आदेशानंतर काही शाळांनी कोरोना काळात देखील 15 टक्के कपात केली नाही. या शाळा मेस्टाशी संबंधित नसून आता सरकारी कारवाईपासून वाचण्यासाठी त्या मेस्टाच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी केला आहे. तसेच अशा शाळांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोशिएशनचे अध्यक्ष तायडे यांच्या उपस्थितीत आज डोंबिवलीत नंदी पॅलेस हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीला इंग्रजी शाळांचे विश्वस्त उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष तायडे म्हणाले, मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांनी कोरोना काळात फीमध्ये 25 टक्के सवलत दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट 15 टक्के शुल्क कपात करण्यात आले. मात्,र मेस्टाने आधीच 25 टक्के शुल्क सवलत दिली असल्याने 15 टक्के शुल्क कपात मान्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे न्यायालयाने मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांच्या विरोधात कारवाई केली जाऊ नये असे म्हटले आहे."
राज्यभरात इंग्रजी माध्यमाच्या 40 हजार शाळा आहेत. त्यापैकी 18 हजार शाळा मेस्टाशी संलग्न आहेत. नऊ हजार शाळा बेकायदेशीर आहेत. त्यामुळे 18 हजार मेस्टा संलग्न शाळा वगळता अन्य 22 हजार शाळा या मेस्टीशी संलग्न नसताना संलग्न असल्याचे सांगून सरकारच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी अध्यक्ष तायडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bachhu Kadu : जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार, गुढीपाडव्यानिमित्त मंत्री बच्चू कडू यांचा संकल्प
- Baramati : बारामती ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा, सोमेश्वर साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग
- Satara News : संघर्ष करुन शाळा गाठणाऱ्या साताऱ्यातील 'त्या' विद्यार्थांच्या कुटुंबाला शिक्षकांची धमकी