एक्स्प्लोर
VIDEO : स्विफ्टच्या धडकेत दुचाकी ढकलणाऱ्या तरुणाचा मृत्यू
सिद्धार्थ थोरात आपली दुचाकी रस्त्याच्या कडेने ढकलत जात होता. त्यावेळी मागून आलेल्या स्विफ्ट कारनं त्याला जोरदार धडक दिली.
औरंगाबाद : रस्त्याच्या कडेने दुचाकी ढकलत जाणाऱ्या तरुणाला एका स्विफ्ट कारने उडवलं. ही धडक इतकी जबरदस्त होती, की तरुण 100 फूटांवर जाऊन आदळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
औरंगाबादमध्ये बायपास रस्त्यावर मंगळवारी रात्री हा भयानक अपघात झाला. 18 वर्षीय सिद्धार्थ थोरात आपली दुचाकी रस्त्याच्या कडेने ढकलत जात होता. त्यावेळी मागून आलेल्या स्विफ्ट कारनं त्याला जोरदार धडक दिली. सिद्धार्थ जवळपास 100 ते 150 फूट दूर जाऊन पडला.
स्विफ्ट गाडी किमान ताशी 120 किमी वेगाने धावत होती आणि चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ तब्बल 70 टक्के धीम्या गतीने दाखवला जात आहे. त्यामुळे ही धडक किती जोरदार होती आणि अपघात किती भयंकर होता, याची कल्पना येईल.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement