एक्स्प्लोर
स्वाध्याय परिवार प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या पत्नी निर्मलाताईंचे निधन
ठाणे: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई आठवले (ताई) यांचे 30 जानेवारी 2017 सोमवारी संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी दु:खद निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. उद्या बुधवार 1 फेब्रुवारीला ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
निर्मलाताईंचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी स्वत:ला स्वाध्याय कार्यात वाहून घेतले. स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचं योगदान मोठं होतं. स्वाध्याय परिवारामध्ये त्या 'ताई' म्हणून ओळखल्या जात.
पांडुरंगशास्त्रींच्या निधनानंतर निर्मलाताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातच वास्तव्याला होत्या. तिथं त्या स्वाध्याय परिवारातील बंधु-भगिनींना मार्गदर्शन करत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement