एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप
सांगली जिल्ह्यात अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असल्याचं बोललं जात आहे. कवठे महाकांळ तालुक्यातील बसापाचीवाडीमध्ये राहणाऱ्या श्रीकांत माळी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
सांगली | सांगली जिल्ह्यात अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असल्याचं बोललं जात आहे. कवठे महाकांळ तालुक्यातील बसापाचीवाडीमध्ये राहणाऱ्या श्रीकांत माळी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
श्रीकांतचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारण विहिरीतील मोटर चोरीच्या आरोपावरुन पोलिसांनी श्रीकांतला पोलिस ठाण्यात बोलावलं होतं. तिथं त्याला बेदम मारहाण झाली आणि यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान, श्रीकांतला रात्रीच सोडून देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. श्रीकांतच्या पाठीवर मारहाणीचे व्रण आढळल्याने या हत्येचे गूढ वाढले आहे.
पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसंच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.
संबंधित बातम्या
अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती
अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement