एक्स्प्लोर

छत्रपती शिवरायांच्या काळात हगवणे कुटुंब असते तर त्यांचा कडेलोट केला असता, सुरेश धस यांचं बीडमध्ये वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जर हगवणे कुटुंब असते तर शिवरायांनी त्यांचा कडेलोट केला असता, असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं आहे.

Suresh Dhas : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो कोणी चुकीचं वागेल, गद्दारी करेल त्याचा कडेलोट केला जात होता. त्या काळात जर हगवणे कुटुंब असते तर छत्रपती शिवरायांनी त्यांचा कडेलोट केला असता, असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं आहे. आताच्या काळात अशा लोकांना संरक्षण मिळते आहे, अशी खंत देखील आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली.

बीडच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश धस बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर संपन्न होत आहे. राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज किल्ले रायगड वर देखील मोठा सोहळा पार पडतोय. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झालेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतोय.

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी केली होती आत्महत्या

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरकडून होणाऱ्या हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात समोर आलेल्या अनेक धक्कादायक खुलास्यांनंतर हगवणे कुटुंबाला पोलिसांनी अटक केली. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी देखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या माहितीनंतर आता वैष्णवीने गळफास घेतलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक तपासणी होणार असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी वैष्णवी हगवणेने आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवलं. सध्या वैष्णवी प्रकरण सर्वत्र चर्चेत आलं आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला जबाबदार असणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे तिच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवस फरार होते, मात्र पोलिसांना सापळा रचून त्यांच्या मुसक्या बांधण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, सासरच्या छळाबाबत दोन्ही सूनांनी तक्रारही केली होती मात्र त्यांचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे राजकीय क्षेत्रात कनेक्शन असल्याने त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही.

महत्वाच्या बातम्या:

शशांक हगवणे आणि लता हगवणेवर आणखी एक गुन्हा, अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी पावलं टाकली, ताबा मिळावण्यासाठी न्यायालयात अर्ज  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
Solapur News: सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
Pune Jain Boarding: आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
Team India Next Cricket Schedule: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmers Protest: 'लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही', Bachchu Kadu यांचा एल्गार
Pankaja Munde : 'मीच गोपीनाथ मुंडेंची खरी वारस', पंकजा मुंडेंचा थेट इशारा
Pune Jain Bording Land Deal: बिल्डरची माघार, तरीही जैन गुरू आंदोलनावर ठाम, ट्रस्टींवर निशाणा
Adani Row: 'स्वतःला फकीर म्हणवणारे Modi, Adani मार्गाने संपत्ती का एकवटतात?', Saamana चा थेट सवाल
Voter List Row: 'यादीमधल्या त्रुटी 1 नोव्हेंबरला मांडणार', Raj Thackeray यांच्या उपस्थितीत MNS ची शिवतीर्थवर बैठक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
Solapur News: सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
Pune Jain Boarding: आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
Team India Next Cricket Schedule: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला?
अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला?
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Shani Dev: 2026 नववर्षात 'या' 4 राशींचं चांगभलं करणार शनिदेव! संपत्ती, पैसा, प्रेम, चांगला पगार, मागाल ती इच्छा पूर्ण होईल
2026 नववर्षात 'या' 4 राशींचं चांगभलं करणार शनिदेव! संपत्ती, पैसा, प्रेम, चांगला पगार, मागाल ती इच्छा पूर्ण होईल
Sarabhai vs Sarabhai Title Song, Satish Shah Funeral: 'साराभाई वर्सेस साराभाई'चं टायटल ट्रॅक गाऊन सतीश शाहांना अखेरचा निरोप; संपूर्ण स्टारकास्ट भावूक VIDEO
'साराभाई वर्सेस साराभाई'चं टायटल ट्रॅक गाऊन सतीश शाहांना अखेरचा निरोप; संपूर्ण स्टारकास्ट भावूक VIDEO
Embed widget