Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विशाल गोखले यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ई-मेल केलाय. व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय. धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय, तर नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही गोखले म्हणाले. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे आज वर्धा पोहचल्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवू : बच्चू कडू
अमरावती : बच्चू कडू आपल्या मूळगावी बेलोरा वरून ट्रॅक्टर वरून नागपूर साठी रवाना होताय
बेलोरा याठिकाणी हजारो शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चाला बच्चू कडूंना पाठिंबा
बच्चू कडू यांचं जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी
बेलोरा वरून सगळे ट्रॅक्टर एका लाईनीने नागपूर साठी कूच
आज पहिला मुक्काम वर्धा याठिकाणी होणार
उद्या 28 तारखेला बच्चू कडू यांचं कर्जमाफी साठी हजारो शेतकऱ्यांसह नागपुरात भव्य ट्रॅक्टर मोर्चा...
बच्चू कडू यांना 28 तारखेला सरकारकडून बैठकीचं निमंत्रण सुद्धा देण्यात आले..
सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे आज वर्धा पोहचल्यावर शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवू -
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागील दीड ते दोन तासापासून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागील दीड ते दोन तासापासून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रम असल्यामुळे आज सकाळपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन्ही लेनवर गोरेगाव जोगेश्वरी,अंधेरी,विलेपार्ले, मालाड कांदिवली या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
विलेपार्ले ते मालाड 15 ते 20 मिनिटांच्या प्रवास मात्र वाहन चालकांना दीड ते दोन तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे
या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे
तर नेस्को मधला कार्यक्रम संपला असून पश्चिम द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.
























