Sarabhai vs Sarabhai Title Song, Satish Shah Funeral: 'साराभाई वर्सेस साराभाई'चं टायटल ट्रॅक गाऊन सतीश शाहांना अखेरचा निरोप; संपूर्ण स्टारकास्ट भावूक VIDEO
Sarabhai vs Sarabhai Cast Sang Title Song In Satish Shah Funeral: 'साराभाई वर्सेस साराभाई' मध्ये सतीश शाह यांची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. अशातच सतीश शाह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शोची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.

Sarabhai vs Sarabhai Cast Sang Title Song In Satish Shah Funeral: बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते, ज्यांनी कधीकाली टेलिव्हिजनवरच्या मालिकेतूनही प्रेक्षकांना खळखळून हसवलं, 'साराभाई वर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) या टेलिव्हिजन शोमधले (Television show) सतीश शाह (Satish Shah) यांनी 25 ऑक्टोबर रोजी वयाच्या अवघ्या 74व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. किडनी फेल झाल्यामुळे अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सतीश शाह यांच्या निधनानं संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकसागरात बुडाली. खुद्द बिग बींनाही आपलं दुःख लपवता आलं नाही. यावेळी सतीश शाह यांच्या अंत्यसंस्कारासाठी फिल्म इंडस्ट्री, टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्याचबरोबर टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत गाजलेला शो 'साराभाई वर्सेस साराभाई'मधले (Sarabhai vs Sarabhai Star Cast) कलाकारही उपस्थित होते. सतीश शाह यांनी आजवर अनेक भूमिका साकारलेल्या, पण 'साराभाई वर्सेस साराभाई'मधल्या त्यांच्या भूमिकेची विशेष चर्चा झालेली. यावेळी 'साराभाई वर्सेस साराभाई'मधल्या स्टारकास्टनं सतीश शाह यांना अनोखी आदरांजली वाहिली आणि आपल्या लाडक्या को-अॅक्टरला अखेरचा निरोप दिला.
'साराभाई वर्सेस साराभाई' मध्ये सतीश शाह यांची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. अशातच सतीश शाह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शोची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. रूपाली गांगुली, सुमीत राघवन, राजेश कुमार, जेडी मजेठिया, देवेन भोजानी आणि अन्य को-अॅक्टर्स उपस्थित होते. यावेळी सर्वजण सतीश शाह यांच्या पार्थिवाजवळ उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या पार्थिव शरीरासमोर उभे राहिले आणि शोचं टायटल ट्रॅक गायलं. संपूर्ण स्टार कास्टनं सतीश शाह यांना वाहिलेल्या अनोख्या श्रद्धांजलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
'साराभाई वर्सेस साराभाई'चं टायटल ट्रॅक गाताना रुपाली गांगुलीला अश्रू अनावर झाले, ती सतीश शाह यांच्या पार्थिवासमोर उभी राहून ढसाढसा रडू लागली. यावेळी जेडी मजेठिया तिचं सांत्वन करताना दिसले. राजेश कुमार आणि सुमीत राघवन यांना देखील सतीश शाह यांच्या पार्थिवासमोर 'साराभाई वर्सेस साराभाई'चं टायटल ट्रॅक गाताना अश्रू अनावर झालेले.
View this post on Instagram
'साराभाई व्हर्सेस साराभाई'च्या संपूर्ण स्टार कास्टची उपस्थिती (Sarabhai vs Sarabhai Cast Sang Title Song)
'साराभाई व्हर्सेस साराभाई' टेलिव्हिजन शोनं प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरीसुद्धा या संपूर्ण स्टारकास्टची चर्चा प्रेक्षकांमध्ये आजही पाहायला मिळते. या स्टारकास्टचा एक एक डायलॉग आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. तसेच, स्टारकास्ट आजही एकमेकांशी मैत्रीच्या नात्यात जोडलेली आहे, शोसाठी एकत्र आलेल्या या स्टारकास्टची पुढे घट्ट मैत्री झाली. सर्व कलाकार अनेकदा एकत्र भेटायचे, गप्पा गोष्टी रंगायच्या. एवढंच काय तर, सतीश शाह यांच्या पत्नी मधु शाह यांच्याशीही संपूर्ण स्टारकास्टचे घनिष्ट संबंध होते.
सुमित राघवन यांनी सोशल मीडियावर त्यांचे दिवंगत सह-कलाकार सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक इमोशन व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सतीश यांना केवळ एक सहकारी म्हणूनच नव्हे तर प्रत्येकाच्या आयुष्यावर अमिट छाप सोडणारी वडीलधारी व्यक्ती म्हणूनही संबोधलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जेडी मजेठिया यांनी दिवंगत सतीश शाह यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. "मला धक्का बसलाय... मी एका मोठ्या भावाला गमावलंय. तो माझ्यासाठी कुटुंबासारखा होता... मी कालच त्याच्याशी बोललो, आम्हाला त्याच्या घरी जावं लागलं... मला विश्वास बसत नाहीये..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :



















