लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंकडून अजित दादांचे कौतुक तर मुख्यमंत्र्यांना टोला
शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे. किती खर्च झाला समोर आलं पाहिजे. तो पैसा अंगणवाडी सेविकांना दिला असताय जनतेचा पैसा स्वता:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.
पुणे : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) उचलली आहे. सकाळी 7 वाजता अजित पवार काम करताना दिसतात आणि अजितदादा सकाळी उठून कामं करतात तेच मुख्यमंत्र्यांनी आज हेरलं, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवारांचे कौतुक आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला केले आहे. स्वच्छता अभियानासाठी महानगरपालिका आहे. मुख्यमंत्र्यांनी चहलांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पालिका निवडणुका होत नसल्याने सर्वसामान्य लोकं भरडली जात आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा मी निषेध करते. जनतेच्या पैशाचा चुराडा होतो आहे . शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे. किती खर्च झाला समोर आलं पाहिजे. तो पैसा अंगणवाडी सेविकांना दिला असताय जनतेचा पैसा स्वता:ची राजकिय पोळी भाजण्यासाठी होत आहे.
पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार
भाजप आमदार सुनील कांबळेंची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातील घटना माझ्यासाठी धक्कादायक होती. शिपाई आणि सत्तेत असलेली व्यक्ती मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण होते. देवेंद्र फडणवीसांनी यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे. पोलिसांवर हल्ला झाला आहे. फडणवीसांनी त्याला बोलावून घेऊन जाहीर माफी मागायला लावली पाहिजे. मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांची माफी मागितली पाहिजे. माफी मिळाली नाही तर त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सुळे लढेल.
सत्ता ही विकास करण्यासाठी : सुप्रिया सुळे
माझ्यासारखा संसदेत कोणाचा रेकॉर्ड नाही आणि यांनी मला निलंबीत केलं. संसदेत सगळ्यात जास्त काम मी करते कुणालाही विचारा. माझी माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे.मी पुण्यात काम करत असते तर मी सर्वांची एक मीटिंग घेऊन पुणे शहरातले सगळे प्रश्न आधी सोडवले असते. शहरात पाणी रस्ते वाहतुकीचे मोठे प्रश्न आहे. शहरातील पाण्याचे नियोजन करायला पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे. सत्ता ही विकास करण्यासाठी आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मोठे प्रोजेक्ट सोडून आधी बेसिक कामांवर लक्ष द्या . 13500 कोटी रुपये खर्च करून मेट्रो बांधत आहेत पण बेसिक गोष्टी कडे लक्ष द्या. आज शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत आहे.आळंदीच्या इंद्रायणी नदीला फेस येत आहे. खडकवासल्याचे पाणी दूषित होत चालले आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा :