एक्स्प्लोर

आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हांला मान्य आहे का ? कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? राम कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

प्रत्येक भाषणात अथवा चर्चेत सुद्धा तुमचा आवडता शब्द मर्द किमान 25 वेळा  उच्चारल्याशिवाय किंवा कोथळा,कडे कपारी, महाराष्ट्र धर्म, कोठे दडलीय ही शब्द संपदा ? असा संतप्त सवाल राम कदम यांनी केला आहे.

मुंबई : एकीकडे देशभरात अयोध्दा सोहळ्याचा आंनद जल्लोष पहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.  आता भाजपा नेते राम कदम (Ram Kadam) यांनी या संदर्भात थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.  जितेंद्र आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत गप्प का? असा संतप्त सवाल राम कदम यांनी केला आहे.

राम कदमांचे  पत्र जसंच्या तसं

मा. उद्धव ठाकरे जी 

नमस्कार..

मी आपणांस हे पत्र एक हिंदू म्हणून लिहतो आहे.. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री अन् ज्येष्ठ नेते आहत.  आपल्या घटक पक्षातील नेते  जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला  मांसाहारी आहेत असे म्हटले. त्यांच्या या राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावरून देशभर आक्रोश सुरु झाला. अनेक आंदोलने निदर्शने झाली. संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला. त्यानंतर अपेक्षा होती त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती. मात्र त्यांनी माफी न मागता उलट प्रभू राम आणी सीता मदिरापण करत होते, अशी प्रभू रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून  अजून तीव्र भावना भडकविण्याचा प्रयत्न केला.

आज देशभरातील समस्त संत साधू समाज..करोडो करोडो रामभक्त  आश्चर्य व्यक्त करत आहेत. की आपण अथवा आपले प्रवक्ते संजय राऊत गप्प का ? स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे म्हणजे शिवसेनेचे  कार्यकर्ते सुद्धा आव्हाडावर तुटून पडले. त्यांनी दाखवून दिले की तेच खरे स्वर्गीय बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत. मात्र तुम्ही  थंड बसलात? का ?  कुठे गेली तुमची हिंदुत्वची भाषा? मर्दूमकी? का विसर पडला तुम्हांला शिवरायांचा? हा तर प्रचंड गंभीर विषय आहे.  समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का ? हा कैक कोटी मिलियन डॉलरचा महत्वपूर्ण प्रश्न हिंदू समाजाला  पडला आहे..

 भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हांला मान्य आहे का ? अन् नसेल तर आपण अजून पर्यंत खंडन का केले नाही? प्रत्येक भाषणात अथवा चर्चेत सुद्धा तुमचा आवडता शब्द.. मर्द... मर्द... किमान 25 वेळा  उच्चारल्याशिवाय... किंवा तुमच्या भाषेत किंबहुना.. कोथळा.. कडे कपारी.. महाराष्ट्र धर्म.. कोठे दडलीय ही शब्द संपदा..? त्यामुळे आपण रामभक्तासोबत आहत की  आव्हाडांचे समर्थन करता हे देशभरातील संत साधू समाज आणी हिंदू समाजाला कळले पाहिजे..अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की  आपणास हिंदू धर्माशी काहीही देणे घेणे नाही.आणि होय वेळ मिळाला तर जरूर फेसबुकवर देशभरातील साधू संत आणी हिंदू समाज आपल्या मौन असण्याबाबत काय बोलतो आहे ते जरूर पाहा..नाही तर संजय आहेतच तुम्हाला घरं बसल्या सर्व सांगण्यासाठी.. महाभारतातील व्यवस्था आजही आपल्या कडे आहे..

समस्त हिंदूना आपल्या उत्तरांची अपेक्षा..  केवळ  .. शाब्दिक  कोट्याची नाही.. 

धन्यवाद 
राम कदम

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget