'जे माझे मतदार आहेत त्या साडे तीन लाख मतदारांची नावे यादीतून कापली' नितीन गडकरींच्या वक्तव्याचा 'तो' व्हिडिओ यशोमती ठाकुरांकडून ट्विट
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ये अंतर की बात, गडकरीजी सत्य के साथ. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना खोटं ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडिओ पहावा.

Nitin Gadkari on Voter List Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन देत महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप केला आहे. देशभरात 100 हून अधिक ठिकाणी मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना पाच प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल 40 लाख संशयास्पद मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर हेराफेरी करून मोदी पंतप्रधान झाल्याचा घाणाघात सुद्धा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि भाजप विरुद्ध राहुल गांधी असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. राहुल गांधी आणि निवडणूक आयोगाला घेरत असल्याने भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने शपथेवर लिहून द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. मात्र राहुल गांधी यांनी मी संसदेमध्ये शपथ घेतल्याचे सांगत निवडणूक आयोगावर पलटवार केला आहे. दुसरीकडे, बिहारमधील मतदारयादी सुधारणा वरूनही देशात रणकंदन माजलं आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन या बिहारच्या मतदारयाद्या सुधारणांवरून होऊ शकलेलं नाही.
ये अंतर की बात,
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 9, 2025
गडकरीजी सत्य के साथ
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना खोटं ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडिओ पहावा. आतातर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनीच तुम्हाला उघडं पाडतंय. त्यांच्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघात साडे तीन लाख मतदार मतदार… pic.twitter.com/kqKViPAXaO
तब्बल साडेतीन लाख नावे कट करण्यात आली
या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा नोव्हेंबर 2024 मधील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या व्हिडिओ काँग्रेसने नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांनी यांनी आपल्या सुद्धा मतदारसंघांमध्ये तब्बल साडेतीन लाख नावे कट करण्यात आल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की यामध्ये जे माझे मतदार होते जवळचे मतदार होते. त्यांचीच नावे कापली आहेत.
दरम्यान, तुम्हाला कमजोर करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता का? अशी विचारणा केल्या असता ते म्हणाले की मी कोणावरती आरोप करत नाही मात्र ही वस्तुस्थिती असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. मी कोणावर आरोप करत नाही, पण साडे तीन लाख नावे कापली ही सत्य परिस्थिती आहे. यामध्ये माझ्या जवळची नावे होती. माझे नातेवाईक होते. माझ्या कुटुंबातील व्यक्तींची सुद्धा नावे कापण्यात आली. आता महाराष्ट्रातील संशयास्पद मतदारांमुळे आणि मतदारयाद्यांमुळे रणकंदन माजला असतानाच विरोधकांकडून आता नितीन गडकरींचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये ट्विट केला जात आहे. तोच व्हिडिओ यशोमती ठाकूर यांनी विचारणा केली आहे.
भाजपवालेहो, उघडा डोळे, ऐका नीट.
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ये अंतर की बात, गडकरीजी सत्य के साथ. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना खोटं ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडिओ पहावा. आतातर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनीच तुम्हाला उघडं पाडतंय. त्यांच्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघात साडे तीन लाख मतदार मतदार यादीतून वगळले गेल्याचं गडकरीजी सांगतायत. भाजपवालेहो, उघडा डोळे, ऐका नीट.
इतर महत्वाच्या बातम्या
























