कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने अभियंता तरुणाची आत्महत्या, वाळवा तालुक्यातील घटना
कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने एका अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील इटकरे गावात घडली आहे.
सांगली : कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने एका अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा तालुक्यातील इटकरे गावात घडली आहे. निखिल लक्ष्मण भानुसे (वय 28) असे तरुणाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. तीनच महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता.यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निखिल हा सिव्हिल इंजिनियर होता. चारच दिवसांपूर्वी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता.अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून तो अस्वस्थ होता. त्याच नैराश्यातून त्याने बुधवारी रात्री आत्महत्या केली, असे नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
निखील हळव्या स्वभावाचा होता. तो सिव्हिल इंजिनीअर होता. त्याचा केवळ तीन महिन्यापूर्वी विवाह झाला आहे. नुकतीच त्याने या परिसरात बांधकाम व्यवसायासही सुरुवात केली होती.दरम्यान चार दिवसापुर्वी त्याचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासूनच तो चिंतेत व अस्वस्थ होता. या नैराश्येतूनच बुधवारी रात्री त्याने घरासमोरील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्त्या केली. कुरळप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. कोरोना झाल्याच्या भीतीतून त्याने आत्महत्त्या केल्याचे नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. निखिलच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल
सांगली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासंदर्भात नियमावलींचं पालन करण्याबाबत वेळोवेळी आवाहन केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)