एक्स्प्लोर
आता कॉलेजमध्येच ड्रायव्हिंग लायसन्स, रावतेंचा मोठा निर्णय
मुंबई: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक परवान्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थांना दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीचा शिकाऊ परवाना अर्थात लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.
या निर्णयाची अंमलबाजवणी 16 जानेवारीपासून होणार आहे. मुंबईच्या किर्ती महाविद्यालयापासून या योजनेला सुरुवात होईल.
सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरटीओ कार्यालयातील चकरा वाचणार आहेत.
पक्का परवाना कुठे मिळणार?
परिवहन मंत्रालयामार्फत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक परवाना देण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्यांच्यामार्फत शिकाऊ परवाने दिले जातील. मग विद्यार्थ्यांना ठराविक वेळ दिला जाईल. त्यानंतर आरटीओ कार्यालयात त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर आरटीओ कार्यालयात पक्का परवाना दिला जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement