एक्स्प्लोर
Advertisement
एसटीत आता वाहकाचं कामही चालक करणार?
धुळे : एसटी महामंडळाच्या चालक कम वाहक संकल्पनेवरून वाद निर्माण झालाय. एसटी कर्मचाऱ्यांनी देखील या संकल्पनेला दबक्या स्वरात विरोध केलाय. तर एसटीच्या प्रवासी संघटनेसह प्रवाशांनीही चालक कम वाहक संकल्पनेला उघडपणे तीव्र विरोध केलाय. ही संकल्पना राबवल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा एस टी प्रवासी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
एसटी महामंडळातर्फे नुकतीच विविध विभागातील 14 हजार 247 पदांच्या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीये. यात चालक तथा वाहक कनिष्ठ अर्थात चालक कम वाहक पदासाठी 7 हजार 929 जागा भरण्यात येणार आहेत.
एकीकडे महिला सबलीकरणाची भाषा करणारं सरकार आता एसटीत महिला वाहक म्हणून सेवा करू इच्छिणाऱ्या महिलांवर चालक कम वाहक या संकल्पमुळे अन्याय करतंय, तर दुसरीकडे आरटीओ, वाहतूक नियमाचं देखील उल्लंघन करत असल्याचं जाणकार सांगतात.
एसटी महामंडळातर्फे राज्यातील विविध विभागात विना वाहक बस सेवा सुरु करण्यात आली आहे. चालकांना ड्युटी मिळते, मात्र वाहकांना ड्युटी मिळत नसल्याने रजेचा अर्ज द्यावा लागतोय. ड्यूटी न मिळाल्याने वाहकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीबाबत एसटी प्रशासनाने मौन बाळगलं आहे.
एसटीतर्फे भविष्यात विनावाहक फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचं प्रस्तावित असल्याने त्या अनुषंगाने चालक कम वाहक संकल्पना राबवण्यात येत आहेत. मात्र असं असलं तरी प्रत्यक्षात ही चालक कम वाहक संकल्पना सध्या एसटीच्या काही विभागात सुरु देखील झालीये.
एसटीच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेण्याचा अधिकार एसटी प्रशासनाला नक्कीच आहे. मात्र चालक आणि वाहक या एसटीच्या दोन चाकांमधील एक चाक निखळलं तर एसटी चालणार कशी, हा खरा प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement