एक्स्प्लोर
Advertisement
शिरपूरमध्ये आयकर पथकातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग
आयकर विभागाच्या पथकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत पथकातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
धुळे : आयकर विभागाची तपासणी मोहीम सुरु असताना शिरपूरमध्ये आयकर विभागाच्या पथकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत पथकातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्यासह 300 जणांविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथील सहाय्य्क आयकर आयुक्त महेश दत्तात्रय लोंढे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादंवि 120 ब , 143, 353, 354, 117, 188, 201, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
17 जानेवारीच्या रात्री पावणे दहा ते साडे दहाच्या दरम्यान शिरपूरमधील प्रभाकर चव्हाण यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही .
शिरपूरमध्ये झालेल्या या घटनेने धुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. आयकर विभागाने धुळे शहरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच शिरपूरमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य अमरीश पटेल यांच्याकडे तपासणी केली होती.
या दोघांची उद्योग क्षेत्रातील भागीदारी, तसेच त्या उद्योग व्यवसायात असलेले इतर भागीदार यांच्या घरी तसेच व्यापारी प्रतिष्ठाणांवर जाऊन आयकर विभागाने तपासणी केली. शिरपूर येथे एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकून आयकर विभागाने सर्च मोहीम सुरु केली होती. ही मोहीम तब्बल 60 तासांपेक्षा अधिक तास सुरु होती.
शिरपूरमधील प्रभाकर चव्हाण यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथक जेव्हा आलं त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी गोंधळ करत आयकर विभागाच्या पथकाला आपलं कर्तव्य निभावण्यात अडथळा निर्माण केला. यावेळी चव्हाण यांनी देखील त्यांच्या समर्थकांना चिथावणी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे.
जॅकेट घातलेल्या एका व्यक्तीने काही फाईल्स जॅकेटमध्ये लपवून त्या ठिकाणाहून पलायन केलं. यावेळी पथकातील एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. आयकर विभागातीलच महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement