एक्स्प्लोर
Advertisement
सांगली : वाटेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर दगडफेक
वाळवा तालुक्यातील वाटेगावात मतदान केंद्राबाहेर दगडफेक झाली असून, यात 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
सांगली : वाळवा तालुक्यातील वाटेगावात मतदान केंद्राबाहेर दगडफेक झाली असून, यात 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. यात सांगलीतील 453 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळपासून सर्वत्र शांततेच मतदान प्रक्रिया सुरु होती.
पण वाळवा तालुक्यातील वाटेगावात मतदान प्रक्रियेला गालबोट लागणारी घटना घडली. मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये बाचाबाची झाला. याचं पर्यावसन तुफान दगडफेकीत झालं. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत.
दरम्यान, दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. तसेच संपूर्ण गावात तणावाचं वातवरण होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement