एक्स्प्लोर
भिलवडी बलात्कार: महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांची सांगलीला भेट

सांगली : पलूस तालुक्यातील माळवडीत शाळकरी मुलीवर बलात्कारप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भिलवडीला भेट घेऊन सर्व प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी बोलताना मुलींना शाळेतच स्वरक्षणाचे धडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राहाटकर म्हणाल्या की, ''राज्यातील सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहोत. तसेच सर्व महाविद्यालयामध्येही तक्रार बॉक्स योजना राबविणार आहे. शिवाय मुलींना छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या एंट्री पॉइंटवर सीसीटीव्ही बंधनकारक करण्याचा आयोगाचा निर्णय आहे.''
काही दिवसांपूर्वी भिलवडीमधील माळवाडी येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचे समोर आले होते. यानंतर तालुक्यात सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना संशियत म्हणून ताब्यात घेतले, तर पोलिसांची काही पथके आरोपीच्या शोधात पाठवण्यात आली होती.
संबंधित बातम्या
सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वपक्षीय बंद
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















