एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेरोजगार मराठा तरुणांना आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गत मराठा तरुणांना आर्थिक मदत देणार आहे. यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासामार्फत मदत दिली जाणार आहे.
मुंबई : राज्य सरकारनं मराठा तरुणांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियानांतर्गत मराठा तरुणांना आर्थिक मदत देणार आहे. यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकासामार्फत मदत दिली जाणार आहे. याबाबतची माहिती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
या निर्णयामुळे प्रामुख्याने बेरोजगार मराठा तरुण आणि शेतीत विविध प्रयोग करणाऱ्यांना तरुणांना संधी मिळणार आहे. याअंतर्गत तीन गटात विभागणी करुन कर्जाच वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या अभियानाअंतर्गत तरुणांना व्यवसायाकरीता 10 लाखांचं कर्च मिळणार आहे. तर सामुहिक शेतीसाठी 10 लाखांचं बिनव्याजी कर्ज 7 वर्षांसाठी मिळणार आहे. त्याबरोबर मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement