एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा, कलाकारांचा सन्मान होणार
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला.
नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी मोहन कदम आणि कलादानसाठी श्रीकांत धोंगडे यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे.
सन 1976 पासून सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी या मान्यवरांची शिफारस केली होती. पुरस्काराचे रु. 1 लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
निवडणूक
राजकारण
Advertisement