एक्स्प्लोर

मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाने बोलावली बैठक, 'या' विषयावर होणार चर्चा...

State Backward Classes Commission : उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून, आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यासह आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत.

पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा संवेदनशील बनलेला असताना उद्या (30 जानेवारी) रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडून (State Backward Classes Commission) ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून, आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यासह आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आलय. मात्र, सर्वेक्षण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र, सध्याची संवेदनशील परिस्थिती पाहता हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून त्याआधारे मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल कसा लवकर तयार करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्‍यासाठी राज्‍य मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्‍या निकषानुसार सर्वेक्षणाचे काम युध्‍द पातळीवर सुरु आहेत. मात्र, अनेक ठिकाणी याबाबत अडचणी येतांना देखील पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्‍य मागासवर्ग आयोगाने उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत त्यामुळे या बैठकीत कोणत्या-कोणत्या मुद्यावर चर्चा होते हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला असतांना ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा मराठवाडा दौरा...

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्‍यासाठी सर्वेक्षण सुरु असून, याच  पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडून मराठवाडा दौरा करण्यात आला आहे. तर, सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी दूर करुन सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी या दौऱ्यात अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वेक्षण करतांना प्रगणक आणि पर्यवेक्षकाना माहिती संकलित करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून सर्व्हेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे अशा सूचना आयोगाच्या सदस्यांकडून देण्यात आल्या आहेत. 

दौऱ्याची माहिती बैठकीत दिली जाणार? 

मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडून दौरा करण्यात आला, यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी सदस्यांसमोर मांडल्या. आयोगाच्या सदस्यांनी देखील सर्वेक्षणाबाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे दौऱ्यातील आलेल्या सूचना उद्याच्या बैठकीत सदस्यांकडून मांडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याची बैठक महत्वाची समजली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऑन फील्ड; मराठा सर्वेक्षणाच्या अडचणी जाणून घेतल्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget