एक्स्प्लोर

थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटना आक्रमक, उद्या गांधीगिरी पद्धतीने तर 9 ऑक्टोबरला आत्मक्लेश उपोषण आंदोलन

कोरोनाच्या महामारीच्या काळात देखील एसटी कर्मचारी दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेत आहेत. तीन महिन्यांपासून वेतन नसल्यानं आजारपणावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नसल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यांचं वेतन थकल्यानं या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकंटांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात देखील एसटी कर्मचारी दिवसरात्र प्रवाशांच्या सेवेत आहेत. तीन महिन्यांपासून वेतन नसल्यानं आजारपणावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नसल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास संघटनांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या संदर्भात एसटीची एकमेव मान्यता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं या संदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात नमूद केलंय की , कोविड - 19 च्या महामारीच्या काळात एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असतांना त्यांना मात्र तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन नाही, वेतन नसल्यानं कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तर काहींनी उपासमारी होत असल्यानं टोकाचं पाऊल उचललं, असं या निवेदनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं नमूद केलं आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत तीन महिन्यांचे वेतन न झाल्यास 9 ऑक्टोबरला एसटीच्या राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत तीन महिन्यांचे (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) वेतन मिळण्यासाठी इंटक संघटना देखील आक्रमक झाली आहे. संघटनेच्या एका निवेदनात नमूद करण्यात आलंय की, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन मुळातच अत्यंत कमी आहे, त्यात तीन महिन्यांपासून (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. परिणामी एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल घेतल्याचं इंटकने देखील नमूद केलं आहे.

वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यातील कलम 5 अन्वये प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अथवा 7 तारखेपूर्वी वेतन देणं बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात वेळेवर वेतन न दिल्यास कलम 20 अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास इंटकच्या वतीनं उच्च न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं संघटनेनं पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, उद्या गांधी जयंती निमित्त इंटकच्या वतीनं प्रत्येक आगारात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget