ST Workers Strike Live Updates:लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र, वाचा प्रत्येक अपडेट
Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. हा संप आता तीव्र झाला आहे.

Background
ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळानं शिवनेरी बसद्वारे पुणे आणि नाशिकमधून सेवा सुरू केली आहे. शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस नाशिकवरून पुणे, मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या. संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच शिवनेरी बसेसवरील एसटी महामंडळाचा लोगो काढण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणखी किती दिवस सुरु राहणार? प्रवाशांचे होणारे हाल कधी थांबणार? सहा दिवस झाले पण या प्रश्नांची उत्तर कुणालाच शोधता आलेली नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सहावा दिवस आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. अशातच काल नाशिकमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली.
दरम्यान संपकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर तिकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांवर परिवहन मंत्री अनिल परबांनी गंभीर आरोप केलेत. काही कामगारांना कामावर रुजू व्हायचंय मात्र त्यांची अडवणूक सुरु असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय.
नाशिकमध्ये काही बसवर दगडफेक
राज्यभर लाल परीला ब्रेक लागलाय. संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय... शिवाय, काही कामगारांना कामावर यायचं आहे मात्र त्यांना भाजपचे लोक कामावर येऊ देत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. एसटी आंदोलनावरून आझाद मैदानावर परवापासून ठिय्या आंदोलन सुरु आहे.. दरम्यान काल नाशिकमध्ये काही बसवर दगडफेक करण्यात आली.
एसटी संप: आज 36 एसटी बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गस्थ; महामंडळाकडून संप मागे घेण्याचे आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना दुसरीकडे आज 36 एसटी बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गस्थ करण्यात आल्या. तर, एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले.
Maharashtra ST Strike ; एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार
राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) शिष्टमंडळ देखील सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला जाणार आहे























