एक्स्प्लोर
आंदोलन केलं म्हणून निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या सवलती बंद
निवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि वेतनवाढीचा कोणताही संबंध नसताना, त्यांनी एसटीविरोधात आंदोलनात सहभागी होऊन एसटीची प्रतिमा मालिन करणे अयोग्य असल्याचे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे.
मुंबई : आंदोलनात सहभागी झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 25 जानेवारीला एसटी महामंडळाच्या विभागीय आणि आगारांबाहेर वेतनवाढीच्या विषयासंदर्भात आंदोलन केले होते.
25 जानेवारी रोजी एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी एकत्र येऊन, उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतन विषयक अहवालाची एसटी महामंडळाच्या विभागीय आणि आगार कार्यालयाच्या समोर होळी केली होती. या आंदोलनात एसटीतून निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. अशा कर्मचाऱ्यांना त्यात निवृत्तीनंतर देण्यात येणारी मोफत प्रवास सवलत तातडीने बंद करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे मोफत प्रवास सवलत पासेस स्थानिक एसटी प्रशासनाने रद्द केले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने न्यायालयात सादर केलेला वेतनवाढीचा अहवाल अमान्य झाल्याने, त्याची होळी करून निषेध करण्याचा प्रयत्न काही कामगार संघटनांनी केला होता. अशा आंदोलनात एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला असल्याचे एसटी प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
निवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि वेतनवाढीचा कोणताही संबंध नसताना, त्यांनी एसटीविरोधात आंदोलनात सहभागी होऊन एसटीची प्रतिमा मालिन करणे अयोग्य आहे. त्यामुळे त्यांना एसटीकडून मिळणारी मोफत सवलत बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement