एक्स्प्लोर

ST Bus: गुणरत्न सदावर्तेंकडून आजपासून एसटी बंदचा इशारा, पण राज्यभरातील एसटी सेवा सुरळीत

वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे,  पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार,  कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे. 

मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी  गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. राज्यभरातील एसटी वाहतूक सुरु आहे. वर्धा विभागातील सकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरु आगे कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत.  माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे,पाटोदा,दिग्रस,हिंगोली,आणि कळंब आगारातील एसटी बससेवा 100 टक्के सुरु आहे. 

 जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे,  पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार,  कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे. 

काय आहेत सदावर्तेंच्या मागण्या?

गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की,  एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला.

कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने 6 नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 250 आगारातील सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व बस फेऱ्या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

मासिक नफ्यात एसटी महामंडळ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती.त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 9000 कोटी रुपयांचा आतापर्यंत संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. सरकार आणि एसटी महामंडळ यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याची परिस्थिती आहे. आज घडीला एसटी महामंडळ 1990 ते आतापर्यंत एकूण 9 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात आहे. मात्र आता मासिक आणि दैनंदिन तोट्याच प्रमाण कमी झालं आहे.

येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु

 एसटीच्या सर्व (ST Mahamandal)  आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान (Maratha Reservation Protest) अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आलंय. येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे. 

हे ही वाचा :

Beed News : जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु; थेट हिमाचल प्रदेशमधून मागवल्या काचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्काTop 25 : टॉप 25 न्यूज : 6 PM : 6 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget