एक्स्प्लोर

ABP Majha Impact | महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकं, आरोग्यमंत्र्यांचे आदेश

महात्मा फुले आरोग्य योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं. जनआरोग्य योजनेत लुबाडणूक होत असल्याच्या बातमीनंतर टोपेंनी ही घोषणा केली आहे.

जालना : राज्यभरात रुग्णालयांच्या पाहणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत अनेक रुग्णांची रुग्णालयांकडून लुबाडणूक होत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. त्यामुळं ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारनं एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये योजनेचा पूर्ण अभ्यास करून रुग्णालयांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करावी असा आदेश राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जालन्यातील 40 बेडचं कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. त्याचबरोबर जिल्हाधकाऱ्यांनी या पथकात जावून स्वत: किमान पाच रुग्णालयांची तपासणी करणं आवश्यक असल्याचं म्हणत याच्या अमंलबजावणीसाठी परिपत्रक जारी केल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

गोर गरीब जनतेला खाजगी रुग्णालयातही मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली. मात्र याच योजनेत मोठा भष्ट्राचार सुरु असल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जिल्हा असलेल्या जालन्यात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.  योजनेतील अधिकारी आणि एका खाजगी रुग्णालयातील डाॅक्टरांचं हे संभाषण आहे. यामध्ये रुग्णालय योजनेशी सलग्न करण्यासाठी डाॅक्टरानं चार लाख रुपये दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

त्यामुळं आॅडिट न करताच हे अधिकारी पैसे घेवून रुग्णालय सलग्न करतात हे उघड झालं होतं. या व्हिडीओमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील जिल्हा समन्वयक डाॅक्टर गुरुराज थत्तेकर, जिल्हा प्रमुख अमित दरक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅक्टर स्वप्नील अपरे त्याचबरोबर एका खाजगी रुग्णालयातील डाॅक्टर दिसत आहेत. विषेश म्हणजे या व्हिडिओ क्लिपमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

ही क्लिप समोर आल्यानंतर एबीपी माझानं याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर या तीनही अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget