Maha Vikas Aghadi : पृथ्वीराज चव्हाणांकडून ठाकरे पवारांचा विशेष उल्लेख; जागावाटपाचा फाॅर्म्युला सुद्धा दोन वाक्यात सांगून टाकला!
Maha Vikas Aghadi : पृथ्वीराज चव्हाण यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलावरून सूचक भाष्य करताना एक प्रकारे गेल्या काही दिवसांपासून मविआ नेत्यांकडून जी वक्तव्य होत आहेत त्याचाही समाचार घेण्याचा प्रयत्न केला.
Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र, आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सर्व चर्चांना पूर्णविराम देतानाच आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने आणि सर्व घटकांना सामावून घेत लढणार असण्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा एकदा विधानसभेला एकत्रित दिसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
महाविकास आघाडीकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषद बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूक आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा केली. आजची झालेली बैठक त्या अनुषंगाने झालेली पहिली बैठक होती, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
आता मोठा भाऊ, छोटा भाऊ असं कोणी राहणार नाही
पृथ्वीराज चव्हाण यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलावरूनही सूचक भाष्य करताना एक प्रकारे गेल्या काही दिवसांपासून मविआ नेत्यांकडून जी वक्तव्य होत आहेत त्याचाही समाचार घेण्याचा प्रयत्न केला. चव्हाण म्हणाले की आता मोठा भाऊ, छोटा भाऊ असं कोणी राहणार नाही. ज्या पक्षाचे जे उमेदवार चांगले असतील आणि निवडून येण्याची शक्यता असेल, त्यांची ती जागा असेल असे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रचाराचा विशेष उल्लेख
चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रचाराचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मग शरद पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यामुळे या दोन नेत्यांना महत्व देते एक प्रकारे महाविकास आघाडीच्या विजयातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसरीकडे, यावेळी बोलताना शरद पवार यांनी सुद्धा भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनीही भाजपकडून होणाऱ्या प्रचाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. मंगळसूत्र चोरतील हे खरं नरेटिव्ह होतं का? नोकऱ्या देणार का हे खर होतं का? नकली संतान नकली संतांनी खरेदी होते का अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व जाती-धर्मांनी मतदान केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, अजूनही भाजपला जाग नसतील तर निवडणूक निकालाच्या विस्तावाला सामोरे जावं लागेल, असेही त्यांनी रसांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या