एक्स्प्लोर

Pune News : अवैध दारु विक्री आणि अवैध दारु सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम; 29 जणांवर गुन्हे दाखल

अवैध दारु विक्री (liquor ) आणि अवैध दारु सेवन (Pune) करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे. यात 29 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती (state excise department) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे.

Pune News : पुण्यात अवैध दारु विक्री (liquor ) आणि अवैध दारु सेवन (Pune) करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 आणि 84 कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात 7 ते 9 जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवली होती. एकूण 29 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती (state excise department) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 25 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. न्यायालयाकडून या आरोपींना एकूण 37 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022  ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये अशाप्रकारचे एकूण 35 गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यामधील एकूण 71 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून 1 लाख 27 हजार 800 रुपये दंड करण्यात आला आहे. 

अधिक दराने मद्य विक्री करणारे  दुकान आणि देशी दारु बार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक आणि विक्रीचं संदर्भात गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये 382 सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी एकूण 17 प्रस्ताव आणि मोक्काअंतर्गत 2 प्रस्ताव संबंधित  प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. अधिक दराने मद्य विक्री करणारे दारु विक्री दुकान आणि देशी दारु बार विक्रेत्यांवर एकूण 10 विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने वर्ष 2021-22 पेक्षा वर्ष 2022-23 मध्ये एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये 435 ने वाढ झालेली आहे. तर अटक केलेल्या आरोपीच्या संख्येमध्ये 596 ने वाढ झालेली आहे. जप्त वाहनांच्या संख्येत 72 ने वाढ झाली असून जप्त मुद्देमालाच्या किंमतीमध्ये 5 कोटी 86 लाख40  हजार 662 रुपये इतकी वाढ झालेली आहे. 

जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र.18002339999 आणि दूरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे. शहरात गुन्हेगारी विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. कारवाईसाठी विशेष मोहीम देखील राबवण्यात आले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Somnath Suryawanshi Parbhani: गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बदल? जितेंद्र आव्हाडांचा गंभीर सवाल
गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बदल? जितेंद्र आव्हाडांचा गंभीर सवाल
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं
Pakistan Missile : काश्मीर ते कन्याकुमारी भारत सोडाच, पण अमेरिका सुद्धा पाकिस्तानी मिसाईलच्या एकाच टप्प्यात! आम्हाला धोका म्हणत अमेरिकेनं घेतला तगडा निर्णय
काश्मीर ते कन्याकुमारी भारत सोडाच, पण अमेरिका सुद्धा पाकिस्तानी मिसाईलच्या एकाच टप्प्यात! आम्हाला धोका म्हणत अमेरिकेनं घेतला तगडा निर्णय
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणेNilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंकेSharad Pawar Beed Speech : शरद पवारांकडून देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन, काय आश्वासन दिलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Somnath Suryawanshi Parbhani: गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बदल? जितेंद्र आव्हाडांचा गंभीर सवाल
गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बदल? जितेंद्र आव्हाडांचा गंभीर सवाल
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसांत काय झालं?; बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं
Pakistan Missile : काश्मीर ते कन्याकुमारी भारत सोडाच, पण अमेरिका सुद्धा पाकिस्तानी मिसाईलच्या एकाच टप्प्यात! आम्हाला धोका म्हणत अमेरिकेनं घेतला तगडा निर्णय
काश्मीर ते कन्याकुमारी भारत सोडाच, पण अमेरिका सुद्धा पाकिस्तानी मिसाईलच्या एकाच टप्प्यात! आम्हाला धोका म्हणत अमेरिकेनं घेतला तगडा निर्णय
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
Kedar Dighe : कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण, आनंद दिघेंचे पुतणे संतापले; म्हणाले, 'कुठे आहे एक है तो सेफ है?...'
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण, आनंद दिघेंचे पुतणे संतापले; म्हणाले, 'कुठे आहे एक है तो सेफ है?...'
Pakistan MP Video : पाकिस्तानच्या रोमँटिक महिला खासदारचा व्हिडिओ व्हायरल! खासदार बोलताच सभापतींची बत्ती जागेवर गुल
Video : पाकिस्तानच्या रोमँटिक महिला खासदारचा व्हिडिओ व्हायरल! खासदार बोलताच सभापतींची बत्ती जागेवर गुल
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
Ajit Pawar : मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौऱ्यावर; देशमुख, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौऱ्यावर; देशमुख, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
Embed widget