...मग तुम्ही फरार का झाले? आमदार संदीप क्षीरसागर यांचा सवाल, धनंजय मुंडेनांही केलं लक्ष्य
वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्कारली आहे. यावर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिलीय. जर तुम्ही दोषीच नाही तर फरार का झाले? असा सवाल त्यांनी केलाय.
Sandeep Kshirsagar on Walmik Karad : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आरोपी व मास्टरमाईंड असल्याचा आरोप ज्याच्यावर आहे, त्या वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्कारली आहे. वाल्मिक कराड हे आज पुणे सीआयडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:ची बाजू मांडली होती. त्यामध्ये, संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव असल्याचंही कराडने म्हटले होते. या प्ररकणावर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर तुम्ही दोषीच नाही तर फरार का झाले? अस सवाल क्षीरसागर यांनी केला.
जे गुन्हेगार आहेत त्यांची नावे घेऊन मी सभागृहात विषय मांडला होता. त्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की हे किती घातक आहे असे क्षीरसागर म्हणाले. तपास करा सांगितल्यानंतर सिडीआरमध्ये ज्यांची नावे त्यांच्यावर करावई होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र भूमिका घेतली. हा खटला फास्ट ट्रकवर घ्या असेही संदीर क्षीरसागर म्हणाले.
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा, त्यानंतर निर्दोष झाल्यानंतर पुन्हा हवं तर शपथ घ्या, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी मुंडेंना लगावला. काही जण दोन जातीत तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी समोर येतील असेही क्षीरसागर म्हणाले. ही केस थांबवण्यासाठी कधी फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. नैतिकता राखून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असे क्षीरसागर म्हणाले. हा प्रकार घडला त्यावेळी दोन मोबाईल सापडले आहेत. त्यात घटनक्रमाचे व्हिडिओ सुद्धा आहेत, अशी माहिती मिळत आहे. मारहाण करताना जास्त लोक त्या व्हिडीओत दिसत आहेत असेही संदीप क्षीरसागर म्हणाले. पालकमंत्री हा विषय सत्ताधारी पक्षाचा आहे. मात्र, तपास सुरु आहे तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असेही क्षीरसागर म्हणाले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव : वाल्मिक कराड
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी व मास्टरमाईंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आला आहे. त्यानंतर अखेर 23 दिवसानंतर वाल्मिक कराडने शरणागती पत्कारली आहे. वाल्मिक कराड आपल्या खासगी कारमधून पुणे सीआयडी कार्यालयात दाखल झाले. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखे असून पोलिसांना शरण येण्यापूर्वीच वाल्मिक कराडनेएका व्हिडिओच्या माध्यमातून स्वत:ची बाजू मांडली होती. त्यामध्ये, संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी माझा संबंध नसून राजकीय हेतुने मला अकडवण्याचा डाव असल्याचंही कराडने म्हटले होते. आता, वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर विरोधक आक्रमक झाले असून वाल्मिक कराडला शरण यायला कोणी सांगितलेल, कुणाच्या सांगण्यावरुन तो शरण आला असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?