एक्स्प्लोर

सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरुच, अवघ्या पाच दिवसांत सोयाबीनच्या दरात तीन हजारांची घसरण

मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते. या कारणामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

लातूर : लातूरच्या बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या सोयाबीनचा दर हा 5700 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल तीन हजार रुपयाची घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पदरी या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे. या कारणामुळेच सोयाबीनचा हंगाम असूनसुद्धा आवकीवर परिणाम झाला आहे. 

मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते. या कारणामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनकडे वळला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारे पिके म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात आहे. देशात सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेणारं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे. यावर्षी सुरुवातीला उत्तम पावसानं साथ दिली आणि त्याच पद्धतीनं सोयाबीनचा दरही दहा हजाराच्या आसपास पोचला होता. यासर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. 

आवक सुरु, भाव पडले 

ज्या शेतकऱ्यांनी जून-जुलैमध्ये सोयाबीन पेरणी केली आहे. त्यांची काढणी आता सुरु आहे. मृग नक्षत्रात जिल्ह्यामध्ये पावसाने चांगली साथ दिली होती. त्या जोरावर अनेक शेतकर्‍यांनी पेरणी केली होती मात्र जुलै महिन्याच्या शेवटी ला पावसाने मोठा खंड दिला होता. शेतकरी चिंतेत होता ऑगस्ट महिन्यात पावसाने साथ देत सोयाबीनच्या पिकाला जीवदान दिलं होतं आणि याच काळात हळूहळू सोयाबीनचे भाव वाढतांना दिसत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाग मोलाची औषध खरेदी करून फवारणी करून पीक जगवले होतं. अशा शेतकऱ्यांच्या आता राशी सुरु आहेत. शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत आहेत. आवक सुरु असतानाच भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले त्यावेळेस जवळपास आठ हजार 600 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला होता. मात्र हळूहळू हा दर घसरत 5700 पर्यंत आला आहे. दराची ही घसरण अवघ्या पाच दिवसांत झाली आहे. 

काढणीचा खर्च ही वाढला होता. गतवर्षी सोयाबीन काढनीचा खर्च हा एकरी 2200 पासून 2500 पर्यंत येत होता. यावर्षी हा खर्च 3500 ते 4000 पर्यंत येत आहे. शेतकरी वर्गानं हा वाढवून येणाऱ्या खर्चसाठी ही तजवीज केली मात्र बाजारात मालाचे भाव पडले आहेत. 

बाजारात आता आवक सुरु झाली आहे. त्याचवेळी भाव पडतायत. काही दिवसानंतर आवक वाढनार आहे. त्यावेळी काय दर राहतील अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आवक कमी होण्यावर झाला आहे. 

उडरगाव येथील बालाजी मोहिते यानी एकरी 15 ते 20 हजार खर्च करत सोयाबीनचे पिक घेतले "30 कट्टे माल झाला आहे. आताच काट झाला आहे. कालचा भाव आज नाही मिळत म्हणाले. बाजार असा पडत असेल तर आम्ही काय करावे. असा प्रश्न मोहिते यांना पडला आहे. 

भाव असा पडत असल्यामुळं आवक कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी राशी केल्या आहेत. ते घाईत माल घेवून बाजारात येत आहेत. यामुळे भावावर परिणाम होत आहे. काही दिवासांत हे भाव स्थिर होतील. गरज असेल तर माल बाजारात आनावा अन्यथा थांबावे असे मत व्यापारी बालाप्रसाद बिदादा यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
Kolhapur News: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
कोल्हापूर: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
Nagpur Crime: नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं अन् फरफटत नेलं; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी, सहा जण जखमी
Kolhapur News: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
कोल्हापूर: ऑनलाईन रमीत पैशाची उधळण करत कर्जबाजारी, दोघा मित्रांचा दागिने चोरण्याचा कट अन् अनंत चतुर्थीला वृद्ध महिलेला संपवलं
Nagpur Crime: नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
नागपूरच्या कडबी चौकात धक्कादायक घटना, व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
बिहारमधील मतदार छाननीची SIR प्रक्रिया देशभर लागू होणार, निवडणूक आयोगाने घेतला आढावा
Nepal Protest : नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
नेपाळमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुशीला कार्की आघाडीवर, Gen Z आंदोलकांची पसंत माजी सरन्यायाधीश
Aastad Kale Post On Corporate Professionals: 'राजकारण एकमेव क्षेत्र, जिथे...'; मराठी अभिनेत्याची वास्तवाची जाणीव करुन देणारी खरमरीत पोस्ट
'राजकारण एकमेव क्षेत्र, जिथे...'; मराठी अभिनेत्याची वास्तवाची जाणीव करुन देणारी खरमरीत पोस्ट
Pune Crime Andekar Gang Mcoca : आंदेकर टोळीला झटका; बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई; घराचीही झाडाझडती
आंदेकर टोळीला झटका; बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई; घराचीही झाडाझडती
Maharashtra Live: नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
Maharashtra Live: नागपूरच्या कडबी चौकात व्यापाऱ्यावर फायरिंग, हल्लेखोरांनी 50 लाख लुटले
Embed widget