एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल, सोनियांनी सेवाग्राममध्ये स्वत:ची ताटं स्वत: धुतली
वर्ध्यातील आश्रमामध्ये जेवणानंतर स्वत:चं ताट स्वत: धुण्याची पद्धत आहे. स्वावलंबनाचा हा मार्ग महात्मा गांधी यांनी आखून दिला होता. या मार्गावर आज काँग्रेसच्या नेत्यांनाही चालावं लागलं.
वर्धा: वर्ध्यातील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचं सामान्य रुप बघायला मिळालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेवणाची ताटं स्वत:च्या हातानं धुतली. वर्ध्यातील आश्रमामध्ये जेवणानंतर स्वत:चं ताट स्वत: धुण्याची पद्धत आहे. स्वावलंबनाचा हा मार्ग महात्मा गांधी यांनी आखून दिला होता. या मार्गावर आज काँग्रेसच्या नेत्यांनाही चालावं लागलं.
एरव्ही नोकर चाकर दिमतीला असलेल्या नेत्यांनी यावेळी मात्र आपल्या हाताने ताटं धुतलेली वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात पाहायला मिळालं.
पदयात्रेला तुफान गर्दी दरम्यान, भरदुपारी तीनच्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधींच्या हातत हात देण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली. वर्ध्यात काँग्रेसची बैठक गांधी जयंतीच्या निमित्ताने आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे 53 सदस्य उपस्थितत होते. गांधीजींनी 1942 मध्ये वर्ध्यातून इंग्रजांना भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला होता. त्याचाच आधार घेत काँग्रेस आज भाजप मुक्त भारतचा निर्धार करणार आहे.#WATCH: Sonia Gandhi and Rahul Gandhi wash their plates after lunch in Sevagram (Bapu Kuti) in Wardha. #Maharashtra pic.twitter.com/hzC3AGe7kj
— ANI (@ANI) October 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement