एक्स्प्लोर

जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या पोलिसाचा मुलगा पोलीस अधिकारी

जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा रणजीत कोळेकरची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. रणजीतचे वडील धुळा कोळेकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.

पंढरपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा रणजीत कोळेकरची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. रणजीतचे वडील धुळा कोळेकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. धुळा कोळेकर यांनी ९ मे २००२ रोजी वरिष्ठ पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता, तर एक उपअधीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात धुळा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या घटनेवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. तसेच 'जखमी पोलिस 302' हा मराठी चित्रपट देखील बनवला गेला. धुळा यांचा मुलगा रणजीत कोळेकरने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केलं आहे. रणजीतची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. आणखी अभ्यास करून क्लास वन अधिकारी बनायचं रणजीतचं स्वप्न आहे. त्यासाठी आणखी मेहनत करण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. धुळा जेलमध्ये गेल्याने कुटुंब उघड्यावर आले होते. मात्र त्यांच्या पत्नीने अनेक संकटांवर मात करत मुलांचं उत्तम संगोपन केलं. मुलांना चांगलं शिक्षण दिलं. रणजीतचा मोठा भाऊ राहुल याने डीएडनंतर संपूर्ण घराची जबाबदारी उचलली. त्यासाठी राहुलने औषधाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली आणि दोन्ही भावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत केली. रणजीत पोलीस उपनिरीक्षक बनला तर दुसरा भाऊही पोलीस कर्मचारी म्हणून भरती झाला आहे. पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या धुळा यांनी पोलिसांवर गोळीबार केला, मात्र त्यांचाच मुलगा आता पोलिस अधिकारी बनला आहे. धुळा कोळेकर 16 वर्षाच्या दीर्घ कारावासानंतर घरी परतले आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेनंतर धुळा यांना नियतीने दिलेली ही अविस्मरणीय भेट ठरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषणMarkadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजीABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Markadwadi Banner : मारकडवाडी गावात शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी
Ramgiri Maharaj : सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
सनातनी जागे झाले तर जगात उलथापालथ करतील, अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू; हिंदू मोर्चातून रामगिरी महाराजांचा हल्लाबोल
Adani Meets Devendra Fadnavis: उद्योगपती गौतम अदानी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: उद्योगपती गौतम अदानी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Embed widget